Advertisement

मुलाच्या निधनानंतर पालकांनी जे केलं ते तुमचं मन जिंकेल

आज आम्ही तुमची ओळख अशा पालकाशी करून देणार आहोत जे मुलाच्या निधनानंतर त्याच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिकांना रोज मोफत जेवण देतात.

मुलाच्या निधनानंतर पालकांनी जे केलं ते तुमचं मन जिंकेल
SHARES

घरातला एखादा व्यक्तीचं निधन झाले की तो घरच्यांच्या, मित्र-परिवाराच्या आठवणीत राहतो. त्याच्या नावानं काय ते वर्षाला एकदा दान-धर्म देखील केला जातो. रोज कुणी दान-धर्म करत नाही. पण आज आम्ही तुमची ओळख अशा पालकाशी करून देणार आहोत जे मुलाच्या मुत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ रोज मोफत जेवण देतात.


मुलाच्या स्मरणार्थ अन्नदान

मुंबईतील एक जोडपे प्रदीप तन्ना आणि त्यांची पत्नी दमयंती तन्ना मुंबईत गेल्या ७ वर्षांपासून मोफत खाणावळ सेवा राबवत आहेत. २०११ साली त्यांच्या मुलाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मुलाचे नाव निमेश होते. तो २३ वर्षांचा होता. चालू ट्रेनमधून पडून निमेशचा मृत्यू झाला. त्यांच्या पालकांवर तर आभाळच कोसळलं. पण त्या परिस्थितून स्वत:ला सावरत या जोडप्यानं मोठा निर्णय घेतला. निमेशच्या नावानं एक ट्रस्ट सुरू करण्यात आली. श्री निमेश तन्ना चॅरेटेबल ट्रस्ट असं या ट्रस्टचं नाव असून २६ जानेवारी २०१३ साली याची स्थापना झाली.


'अशी' करतात समाजसेवा

निमेश तन्ना चॅरेटेबल ट्रस्ट सध्या १३० हून अधिक गरजूंना टिफिन सर्व्हीस पुरवते.  सुरुवातीला ३० जणांना टिफिन पोहोचवायचे. पण आता संख्या वाढली आहे. गेल्या ७ वर्षात त्यांनी या कामात एकही खंड पडू दिला नाही. १३० हून अधिक नागरिकांना ते मोफत अन्न पुरवतात. तर १०० नागरिकांना धान्य पुरवठा करतात. आदिवासी पाड्यात आणि गरजूंना कपडे, पुस्तकं, स्टेशनरी असं काही ना काही पुरवठा करतात.

मुलाच्या मृत्यूनंतर आम्ही हताश झालो होतो. या दु:खातून स्वत:ला सावरणं कठिण होतं. पण आम्हाला त्याच्या स्नरणार्थ काही तरी करायचं होतं. म्हणून आम्ही त्याच्या नावानं ट्र्स्ट सुरू केली. या ट्रस्ट मार्फत आम्ही ज्येष्ठ नागरिक जे एकटे आहेत आणि ज्यांची मुलं सोडून गेली आहेत अशां ६० वर्ष पार केलेल्यांना टिफिन पुरवतो. यासाठी आम्ही मुलुंडमध्ये स्वत:चं किचन सुरू केलं. त्यात ७-८ जणं मदतनीस म्हणून ठेवली आहेत.

दमयंती तन्ना, श्री निमेश तन्ना चॅरेटेबल ट्रस्ट, संस्थापकआर्थिक मदत कशी होते?

दमयंती आणि प्रविण तन्ना हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे दर महिन्याला एवढा खर्च त्यांना परवडणारा नाही. सुरुवातीला त्यांनी स्वत: खर्च केला. पण जेवण पुरवणाऱ्यांचा आकडा वाढला तशा त्यांच्या खर्चात वाढ झाली. पण मित्र-परिवार आणि नातेवाईक यांच्याकडून त्यांना आर्थिक मदत केली जाते, असंही ते सांगायला विसरले नाहीत.


काय मग मंडळी १० रुपयाच्या थाळी बद्दल चर्चा झाली असेल तर या जोडप्यालाही करा मदत. जेणेकरून तुम्ही केलेल्या मदतीमुळे ते आणखीन काही ज्येष्ठ नागरिकांची मदत करू शकतील.  


हेही वाचा

चिमुकल्यांच्या पोटाची आग शमवणारे 'अन्नदाता'

वर्ल्ड हंगर डे : मुंबईतील या ५ संस्थांना करा अन्नदान आणि व्हा चांगल्या कामाचे भागीदार
संबंधित विषय
Advertisement