Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

अखेर २५ दिवसांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने शंभरी ओलांडली होती.

अखेर २५ दिवसांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त
SHARES

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने शंभरी ओलांडली होती. गॅस, खाद्यतेल दरवाढीबरोबरच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका सामान्यांना बसत होता. मात्र अखेर २४ दिवसानंतर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये बदल करत सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.

पेट्रोल १८ रुपयांनी तर डिझेलचे दर १७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळं मुंबईत पेट्रोलचे दर ९७.४० रुपये प्रति लीटर इतके तर डिझेल ८८.४२ रुपये प्रति लीटर झाले आहे. तसेच दिल्लीत पेट्रोल ९०.९९ रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर ८१.३० रुपये झाले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल ९३ रुपयांवर पोहचले आहे. तर कोलकत्तामध्ये पेट्रोल १७ पैशांनी स्वस्त होत ९१.१८ रुपयांवर पोहले आहे.

प्रत्येत दिवशी सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमधील फेरबदल जाहीर होतो. त्यामुळे प्रत्येत दिवशी जाहीर झालेल्या दरनुसार पेट्रोल-डिझेलची रक्कम घेतली जाते. परंतु सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर एक्साइ़ज ड्युटी, डिलर कमिशन, आणि अन्य कर लागू होत असल्याने पेट्रोल-डिझेलचे दर दुप्पट झाले आहे. मात्र आज २४ दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याने नागरिकांनी दिलासा मिळत आहेत.हेही वाचा -

महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचं वसुलीचं टार्गेट १०० कोटी असेल तर, इतरांचं..?

“मुख्यमंत्री पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेत”


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा