माटुंगा पोलिसांकडून आजींचा वाढदिवस साजरा

माटुंगा - ललिता सुब्रमन्यम. 83 वर्षांच्या ललिता मांटुगा परिसरातल्या उषा या निवासस्थानी एकट्याच राहतात. ललिता यांची मुले परदेशात राहत असल्यानं त्यांचा वाढदिवस साजरा करणारे नातेवाईक असे कोणीच नाही. पण सर्वांच्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस गेल्या दोन वर्षांपासून ललिता यांचा वाढदिवस आनंदात साजरा करतात. 2 जानेवारीला ललिता यांचा वाढदिवस असतो. पोलीस अधिकाऱ्यांपासून ते कॉन्स्टेबल सर्वच या दिवशी एकत्र येतात.

माटुंगा पोलिसांसाठी ललिता या आईपेक्षा कमी नाहीत. प्रेमानं ते ललिता यांना 'मम्मी' असं संबोधतात. सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रिदवाक्य प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं. खरच यावरून पोलिसांची माणुसकी आणि आपुलकीची दुसरी बाजू पाहायला मिळाली.

Loading Comments