'हा' तर कचऱ्याचा पूर, वदप धबधबा परिसरातून १ हजार किलो कचरा साफ

वॉटरफॉल परिसरात पर्यटक अक्षरश: उकिरडा करतात. कचरा, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या पेपर प्लेट्स हे सर्व तिथंच टाकून निघून जातात. यामुळे आसपास राहणाऱ्या गावकऱ्यांना तर त्रास सहन करावा लागतोच. यासोबतच पर्यावरणाचा ऱ्हासदेखील होतो.

  • 'हा' तर कचऱ्याचा पूर, वदप धबधबा परिसरातून १ हजार किलो कचरा साफ
  • 'हा' तर कचऱ्याचा पूर, वदप धबधबा परिसरातून १ हजार किलो कचरा साफ
  • 'हा' तर कचऱ्याचा पूर, वदप धबधबा परिसरातून १ हजार किलो कचरा साफ
  • 'हा' तर कचऱ्याचा पूर, वदप धबधबा परिसरातून १ हजार किलो कचरा साफ
SHARE

मुंबईजवळ अनेक वॉटरफॉल्स आहेत. पावसाळ्यात हे वॉटरफॉल पर्यटकांनी तुडूंब भरून वाहत असतात. आपल्यापैकी अनेक जण वर्षातून एकदा मुंबईजवळील अनेक वॉटरफॉल्सपैकी एका वॉटरफॉलला भेट देतात. तिथल्या निसर्गरम्य वातावरणात मजा, मस्ती करतात. बस... तितकंच काय ते पर्यटकांचं पर्यावरणाशी नातं. एकदा तिथून निघालं की पुन्हा त्याच्याकडे वळून पहायचं नाही. पण आपण कितीही दुर्लक्ष केलं काय किंवा डोळे झाकले काय? पण परिस्थिती बदलत नाही आणि हेच सत्य आहे.कचऱ्याचा पूर

वॉटरफॉल परिसरात पर्यटक अक्षरश: उकीरडा करतात. कचरा, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या, पेपर प्लेट्स हे सर्व तिथंच टाकून निघून जातात. यामुळे आसपास राहणाऱ्या गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. यासोबतच पर्यावरणाचा ऱ्हासदेखील होतो. पण ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी एनव्हायरमेंट लाइफचे संस्थापक धर्मेश बराई यांनी उचलली आहे. नुकतंच एनव्हायरमेंट लाइफच्या सदस्यांनी कर्जतमधील वदप धबधब्यावर स्वच्छता मोहीम राबवली


मिशन वदप

मनमोहक असा कर्जत इथला वदप धबधबा हा पर्यटकांच्या अधिक पसंतीस उतरत आहे. मिनी माथेरान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढाकच्या डोंगरातून हा धबधबा कोसळतो. कर्जत-जांभिवली रस्त्यावर उजवीकडे डोंगर कड्यात कोसळणारे पांढरे स्वच्छ दुधासारखे पाणी जेव्हा कोसळते तेव्हा वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो. कर्जत रेल्वे स्थानकापासून केवळ ६ कि.मी. अंतरावर हा धबधबा आहे. याच धबधब्यावर एनव्हायरमेंट लाइफनं १६ वी स्वच्छता मोहीम राबवली

स्वच्छता मोहिमेत वदप धबधब्यातून त्यांनी १ टन म्हणजेच १००० किलो कचरा साफ केला. यात प्लॅस्टिक रॅपर्स, कॅरी बॅग्स, प्लॅस्टिक बॉटल्स, तुटलेल्या बाटल्या, ग्लास, थंडाचे टीन असं बरंच काही सापडलं. या सर्व वस्तू पर्यावरणाला हानी पोहोचवतात. याशिवाय जैवविविधतेचंदेखील नुकसान करतात


गावकऱ्यांचीही साथ

या स्वच्छता मोहिमेत एनव्हायरमेंट लाइफच्या ३० सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. यासोबतच वदप गावातील गावकऱ्यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.

माझा कचरा माझी जबाबदारी

माझा कचरा माझी जबाबदारी या टॅगलाईन अंतर्गत ही स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आली. आतापर्यंत त्यांनी १६ धबधब्यांवर स्वच्छता मोहीम राबवली आहे. या स्वच्छता मोहिमेतून त्यांनी एकूण १० टन कचरा साफ केला. यापुढेही त्यांची स्वच्छता मोहीम अशीच सुरू राहणार आहेहेही वाचा

जागतिक फोटोग्राफी दिन : आता दृष्टीहीनही करू शकणार फोटोग्राफी

सिद्धार्थ महाविद्यालयाकडून मुलुंडमध्ये वृक्षारोपण
संबंधित विषय
ताज्या बातम्या