Advertisement

निर्व्यसनी जोडीदारासाठी जनजागृती


निर्व्यसनी जोडीदारासाठी जनजागृती
SHARES

'मला नको बंगला गाडी, मज हवा निर्व्यसनीच गडी' असं बोलण्याची सध्या मुलींवर वेळ आलीय. कारण सध्या व्यसन करणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या वाढते आहे. हल्लीची मुलं मित्रांच्या संगतीत सहज व्यसनाच्या आहारी जातात. याच पार्श्वभूमीवर 'व्हेलेंटाईन डे'च्या निमित्ताने 'महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ'च्या वतीने व्यसनमुक्तीसाठी दरवर्षी एक उपक्रम राबवला जातो. यंदा ही असाच उपक्रम व्यसनमुक्तीसाठी मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरात राबवण्यात आला.

या उपक्रमात मुला-मुलींनी घोड्यावर स्वार होऊन डोक्याला बाशिंग बांधून, संदेश देऊन प्रेम आणि व्यसन यामधला फरक समजावण्याचा प्रयत्न केला. सध्या स्पर्धेच्या युगात अनेक जण दडपणाचे ओझे वाहून व्यसनाच्या आहारी जातात. इतकंच नाही, तर मुलांसोबत मुलीही धुम्रपान करतात.



या पाश्र्वभूमीवर काही महाविद्यालयातील तरुणींनी रस्त्यावर उतरून निर्व्यसनी जोडीदार निवडण्याची शपथ घेतली. चेहऱ्यावर न जाता तो किंवा ती ‘निर्व्यसनी' असावा किंवा असावी, अशा संदेशाचे मास्क लावून तरुणींनी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती केली.

प्रेम करा, पण, जोडीदार निर्व्यसनीच निवडा’ असा संदेश या तरुणींनी दिला आहे. आम्ही दरवर्षी अशा पद्धतीचा उपक्रम व्हेलेंटाईन डेच्या एक दिवस आधी राबवतो.

विद्या विलास, सरचिटणीस, नशाबंदी मंडळ

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितलं की, "सध्या तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढताना दिसतंय. माझ्याकडे उपचारांसाठी दररोज 2-3 रुग्ण येतात. ज्यांना कुठल्यातरी व्यसनाची सवय असते. या मुलांना व्यसनापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी, अशा पद्धतीने जनजागृती करणं आवश्यक आहे."

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा