Advertisement

समाज सेवक प्रकाश आमटे यांना ब्लड कॅन्सर, रुग्णालयात...

सुप्रसिद्ध समाज सेवक प्रकाश आमटे यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सरचे निदान झाले.

समाज सेवक प्रकाश आमटे यांना ब्लड कॅन्सर, रुग्णालयात...
SHARES

सुप्रसिद्ध समाज सेवक प्रकाश आमटे यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सरचे निदान झाले. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरूयत.

प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरसोबतच न्यूमोनियाच्या संसर्गामुळे गेल्या 10 दिवसांपासून खूप ताप आहे. पुणे येथील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सध्या त्यांच्यावर न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. येत्या 2 किंवा 3 आठवड्यांनंतर, शरीराची ताकद वाढल्यानंतर रक्त कर्करोगाचा उपचार सुरू होऊ शकतो.

केसाळ पेशी ल्युकेमिया हा रक्ताचा एक दुर्मीळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. यामध्ये अस्थिमज्जा खूप जास्त म्हणजे अतिरिक्त पांढऱ्या पेशींची निर्मिती (लिम्फोसाइट्स) करते. एरव्ही या पांढऱ्या पेशी म्हणजे सैनिक पेशी शरीरातील रोगजंतुशी लढतात. पण, अतिरिक्त निर्मितीमुळे रोग प्रतिकारक यंत्रणेत त्या तारक ऐवजी मारक ठरतात. या अतिरिक्त पांढऱ्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली केसासारख्या दिसतात.

सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, विनाकारण वजन कमी होणे, धाप लागणे, जास्त घाम येणे, अनेकदा रात्री, सुजलेल्या लिम्फ नोड्स, वारंवार संक्रमण आणि ताप, त्वचेवर लहान लाल ठिपके, वाढलेले यकृत किंवा प्लीहा, सोपे जखम आणि रक्तस्त्राव, हाडांचे दुखणे विशेषत: बरगड्यांच्या खाली.

डॉ. प्रकाश आमटे यांना फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.



हेही वाचा

मुंबईच्या १० वर्षांच्या मुलीची एव्हरेस्ट पायथ्यापर्यंत यशस्वी मोहीम

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा