Advertisement

अयोध्येसाठी मुंबईहून विशेष ट्रेन धावणार

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवारी ही माहिती दिली.

अयोध्येसाठी मुंबईहून विशेष ट्रेन धावणार
SHARES

अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक येत आहेत. मात्र, भाविकांची गर्दी पाहता मुंबई ते अयोध्येसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुढील वर्षी मुंबई ते अयोध्येसाठी विशेष ट्रेन धावणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवारी ही माहिती दिली. पुढील वर्षी 24 जानेवारीनंतर अयोध्येसाठी विशेष ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.

आत्मसन्माम मंचाची मागणी

मुंबई ते देवभूमी अयोध्येपर्यंत रोजची ट्रेन सुरू करण्याची मागणी आत्मसन्मान मंचने केली आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय यात्रेकरूंना लक्षात घेऊन एसी ट्रेन चालवण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

अध्यक्ष नित्यानंद शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, येत्या जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत भव्य आणि दिव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. देवभूमी अयोध्या जगातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक बनणार आहे. संख्या वाढली आहे, त्यामुळे मंदिराच्या उद्घाटनानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य भागातून अयोध्येला जाणाऱ्या रामभक्त यात्रेकरूंची संख्या आणखी वाढणार आहे.

दादरहून अयोध्येसाठी विशेष ट्रेन

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबईकरांना नव्याने बांधलेल्या राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पुढील वर्षी 24 जानेवारीनंतर अयोध्येला एक 'विशेष' ट्रेन चालवली जाईल. मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना शेलार म्हणाले की, मुंबईकरांना भगवान रामाच्या दर्शनासाठी दादरहून अयोध्येला जाण्यासाठी स्पेशल ट्रेनने जाता येणार आहे.हेही वाचा

आता मुंबईतील रहिवासी ऑनलाइन तक्रारी दाखल करू शकतात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा