Advertisement

दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानंतरही महिलांचा धर्म बदलणार नाही - सुप्रीम कोर्ट


दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानंतरही महिलांचा धर्म बदलणार नाही - सुप्रीम कोर्ट
SHARES

दुसऱ्या धर्मात लग्न केलेल्या महिलेला आता आपल्या मनाविरोधात जाऊन पतीचा धर्म स्वीकारण्याची गरज राहणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पारसी समुदायातील महिलेच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.


काय आहे हे प्रकरण?

खरेतर गुलरोख एम गुप्ता नावाच्या महिलेनं एका हिंदू धर्मातल्या व्यक्तीसोबत लग्न केलं. पण वलसाड येथील पारसी बोर्डाने तीला तिच्या पालकांच्या अंत्यविधीत सहभाही होऊ दिलं नाही. सोबतच २०१० साली पारसी बोर्डाने याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टानेही पारसी बोर्डाच्या बाजूनंच निकाल दिला. त्यामुळे गुलरोख यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.


सुप्रीम कोर्टानं दिला हा निर्णय

हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी सुप्रीम कोर्टात झाली. यावेळी सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टानं 'दुसऱ्या धर्मातील मुलीशी लग्न केलेल्या पारसी मुलाला त्याच्या पालकांचं अंत्य संस्कार करताना रोखलं जात नाही, मग महिलेला मानवी हक्कापासून का वंचित ठेवलं जावं, असा प्रश्न विचारला आणि पतीच्या धर्माप्रमाणेच धर्म स्वीकारण्याचा दबाव महिलेवर राहणार नाही, असा निर्णय दिला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा