Advertisement

Vi network down: वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क डाऊन; अर्धा महाराष्ट्र नॉट रिचेबल

पुण्यात झालेल्या तांत्रिक बिघाडानं राज्याच्या निम्म्याहून जास्त सर्कलमध्ये ग्राहकांना Vi च्या कनेक्टिव्हिटी फेल्युअरचा त्रास सहन करावा लागत आहे.

Vi network down: वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क डाऊन; अर्धा महाराष्ट्र नॉट रिचेबल
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रात मोबाईल (mobile) सेवा पुरवठादार असलेल्या वोडाफोन-आयडियाचे (vodafone-idea) मोबाईल नेटवर्क (network) पूर्णपणे डाऊन झालं आहे. मागील काही तासांपासून वोडाफोन-आयडियाचं (Vi) नेटवर्क नसल्यानं ग्राहकांची गैरसोय झाली असून, ग्राहकांनी मोबाईलच्या दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पुण्यात झालेल्या तांत्रिक बिघाडानं राज्याच्या निम्म्याहून जास्त सर्कलमध्ये ग्राहकांना Vi च्या कनेक्टिव्हिटी फेल्युअरचा त्रास सहन करावा लागत आहे.

कंपनीच्या या ढिसाळ कारभारावर ग्राहकांनी सोशल मीडियावर (social media) जोरदार टीका केली आहे. राज्यातील काही भागात बुधवार रात्रीपासून Vi चं नेटवर्क गुल झालं आहे. पुण्यासह मुंबईत देखील काही ठिकाणी Vi चं नेटवर्क डाउन झालं आहे. याबाबत Vi च्या ग्राहकांनी सोशल मीडियावर कंपनीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नेटवर्क नसल्यानं ग्राहकांना कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी देखील संपर्क करणं अवघड बनलं आहे. यामुळे ट्विटरवर वोडाफोन टॉप ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

वोडाफोन आयडियानं नेटवर्क इश्यू (network issue) झाल्याचं मान्य केलं असून, त्यावर काम सुरु असून किमान ५ ते ६ तासांचा अवधी लागेल, असं स्पष्ट केलं आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी नेटवर्कमध्ये बिघाड झाल्याचे कंपनीने म्हटलं आहे. पुणे, मुंबई, नाशिक , नागपूर या महानगरांमध्ये वोडाफोन ग्राहकांचा संपर्क तुटला आहे.



हेही वाचा - 
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा