Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

महिलांना संगीत शिकवण्याचा वसा घेतलेली श्रृती पाठक

जनजागृती आणि शिक्षणामुळे महिलांनी सारी बंधने आता ठोकरली आहेत. अशाच काही महिलांनी चार भिंतीच्या बाहेर पाऊल टाकत स्वत:च्या आवडी निवडी जोपासण्याचा चंगच बांधला आणि या महिलांना साथ मिळाली ती गायिका श्रृती पाठक-दत्तानी यांची.

महिलांना संगीत शिकवण्याचा वसा घेतलेली श्रृती पाठक
SHARES

आजकाल भाषणांमधून, चर्चेतून, शिबिरातून वापरले जाणारे विधान म्हणजे स्पर्धेच्या युगात महिलांनी सर्व आव्हानात्मक क्षेत्रे पादाक्रांत केलेली आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाद्वारे ठसा उमटवला आहे. निर्मितीची बहुमोल देणगी घेऊन आलेल्या स्त्रीला पुरुषप्रधान संस्कृतीनं उपभोगाची उपमा दिलेली होती. एक माणूस म्हणून ती काय करू शकते याची नोंद घ्यायला समाज विसरला होता. चूल आणि मूल, चार भिंतीच्या आतील अस्तित्वाचा दर्जा तिला प्राप्त झाला होता. परंतु जनजागृती आणि शिक्षणामुळे सारी बंधने तिनं आता ठोकरली आहेत.  अशाच काही महिलांनी चार भिंतीच्या बाहेर पाऊल टाकत स्वत:च्या आवडी निवडी जोपासण्याचा चंगच बांधला आणि या महिलांना साथ मिळाली ती गायिका श्रृती पाठक-दत्तानी यांची


महिलांचा संगीत क्लास

श्रृती पाठक-दत्तानी यांचे वडील आनंदसागर पाठक यांनी ३० वर्षांपूर्वी 'आनंद सागर सुगम संगीत' या नावानं क्लास सुरू केला. आनंद पाठक यांना संगीत शिकवण्याची प्रचंड आवड होती. म्हणून त्यांनी हा क्लास सुरू केला. वडिलांना हातभार लावण्यासाठी श्रृती पाठक - दत्तानी यांनी १० वर्षांपूर्वी क्लासमध्ये संगीत शिकवण्यास सुरुवात केली. आज वडिलांसोबत श्रृती तिथं येणाऱ्या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देतात. श्रृती यांच्या क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महिलांची संख्या ही सर्वाधिक आहे. जवळपास ८०-९० महिला त्यांच्याकडे संगीत शिकायला येतात. अगदी ५ वर्षांपासून ते ७५ वयोगटातील महिला या क्लासमध्ये संगीत शिकायला येतात.

 

विरोध झुगारला

श्रृती यांच्या क्लासेसमध्ये येणाऱ्या काही महिला गृहिणी, काही नोकरी करणाऱ्या तर काही व्यावसायिका आहेत. क्लासमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेच्या मनात लहानपणापासून म्हणा किंवा कालांतरानं संगीत शिकण्याची इच्छा होती. पण कुटुंबियांकडून होणारा विरोध आणि नोकरी-व्यवसायातून वेळ काढून स्वत:च्या आवडी-निवडी जपणं या महिलांसाठी थोडं कठीण होतं. पण ही सारी बंधनं झुगारून त्यांनी स्वत:च्या आवडी-निवडी जपण्याचाही निर्णय घेतला. अशा महिलांच्या पाठिशी श्रृती या ठामपणे उभ्या आहेत.

घरच्या जबाबदाऱ्यानोकरी यातच महिलांचं आयुष्य गुंतलेलं असतंस्वत:साठी असा वेगळा वेळच त्यांना देता येत नाहीपण त्यातूनही वेळ काढून स्वत:च्या आवडी निवडी जपणं ही खरच मोठी गोष्ट आहेएकप्रकारे या महिला त्यांची राहिलेली स्वप्न पूर्ण करत आहेत. माझ्या माध्यमातून त्यांची ही स्वप्न पूर्ण होत आहेत याचा मला नक्कीच आनंद आहे

- श्रृती पाठक-दत्तानीगायिका   


महिलांसाठी व्यासपीठ 

श्रृती यांच्याकडे येणाऱ्या महिलांना त्या सुगम संगीताचे धडे देतात. त्यांच्या क्लासेसमध्ये फक्त संगीताचे धडे गिरवले जात नाहीत, तर या महिलांना एक व्यासपीठ देखील उपलब्ध करून दिले जाते. यासाठी त्यांच्याकडून प्रचंड मेहनत करून घेतली जाते. गाणं कसं सादर करायचं, स्टेजवरील भिती कशी घालवायची यापासून सर्व गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. दर पाच-सहा महिन्यांनी त्यांच्या मैफिली भरतात. अगदी ५ वर्षाच्या चिमुकलीपासून ७५ वर्षांच्या आजींपर्यंत सर्व गाणं गाऊन मैफिलीची शोभा वाढवतात. सुरांची अनोखी मैफिलीत अनेक श्रोते येतात. या व्यासपीठामुळेच आज त्यांची स्वप्न पूर्ण होत आहेत. कमालीचा आत्मविश्वास या महिलांमध्ये पाहायला मिळत आहे.


सुपर म्युझिकल टी-२०

सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून किंवा किती बिझी असलं तरी थोडा वेळ काढून संगीतात प्रचंड मेहनत घेणाऱ्या महिलांची श्रृतीनं एक वेगळीच टिम तयार केली आहे. सुपर म्युझिकल टी-२० असं नाव या टिमला तिनं दिलं आहे. या टीममध्ये एकूण २० महिला आहेत. या सर्व महिला वेळात वेळ काढून नियमित क्लासला येतात. दिलेला अभ्यास, रियाज वेळेत करतात. अशा मेहनती महिलांकडून श्रृती एकही पैसा घेत नाही. त्यांना विनामुल्य संगीताचे धडे दिले जातात

 हेही वाचा -

Exclusive : चेहरा जळाला पण स्वप्न नाही; शरीरावर व्रण असलेली पहिली मॉडेल
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा