Advertisement

माझा बापमाणूस!

बाबा आजच्या तरूणाईसाठी धाक नव्हे, तर हक्काचा मित्र झालाय. चुकलो की तो ओरडतो. पण प्रेम पण तितकंच करतो. धाक दाखवून शिस्त लावतो तसंच मित्रासारखी धमालही तो करतो. 'ओ बाबा ते ए बाबा' असा प्रवास झाला असला तरीही त्याचं महत्त्व किंचितही कमी होत नाही. उलट हे नातं अधिकाधिक गहिरं होत जातं. असंच काहीसं मत आजच्या तरूणाईनं व्यक्त केलं आहे.

माझा बापमाणूस!
SHARES

ई हे आपल्यासाठी मूर्तिमंत प्रेम असतं, तर वडिल म्हणजे धाक, दरारा! वडिलांशी मैत्री, जिव्हाळ्याचं नातं म्हटल्यावर अनेकांच्या अंगाचा आजही थरकाप उडतो. काहीही असलं, तरी वडिलांचं मुलांवरील प्रेम बहुतांश अव्यक्तच असतं. मुलांच्या हौसेसाठी आपल्या हौसेला मुरड घालणारे बाबा, मुलांना सर्व उत्कृष्ट मिळावं म्हणून जीवाचं रान करणारे बाबा, मुलांना दिवाळीत कपडे आणि फटाके मिळावेत किंवा इतर सोई-सुविधा मिळाव्यात म्हणून काटकसर करणारे बाबा, मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांना शिस्तीचा बडगा दाखवणारे, कुठल्याही संकटात एखाद्या पहाडासारखे खंबीरपणे पाठिशी उभे राहणारे बाबा... आपलं प्रेम सहजपणे ओठांवर येऊ देत नाहीत, पण म्हणून त्यांच्या हृदयात प्रेम नसतं का?

आई हे देवाचं दुसरं नाव आहे, तर बाबा देखील दैवतच आहे. आई साखरेसारखी गोड असते, तर बाबा फणसासारखे! बाहेरून कडक तर आतून नरम... सुपरमॅन, बॅटमॅन किंवा स्पायडरमॅनसारख्या त्याच्याकडे स्पेशल पावर नाही. पण मुलांच्या आयुष्यात त्याचं स्थान कुठल्या सुपरहिरोपेक्षा कमी नाही. असा हा बाबा आजच्या तरूणाईसाठी धाक नव्हे, तर हक्काचा मित्र झालाय. चुकलो की तो ओरडतो. पण प्रेम पण तितकंच करतो. धाक दाखवून शिस्त लावतो तसंच मित्रासारखी धमालही तो करतो. 'ओ बाबा ते ए बाबा' असा प्रवास झाला असला तरीही त्याचं महत्त्व किंचितही कमी होत नाही. उलट हे नातं अधिकाधिक गहिरं होत जातं. असंच काहीसं मत आजच्या तरूणाईनं व्यक्त केलं आहे.


सगळे म्हणतात बाबांचे गुण घेतलेस. मी म्हणेन मी खऱ्या अर्थाने समृद्ध त्यांच्यामुळेच झाले. पाककला, लिखाण, संगीताची आवड, आवाजाचे कौशल्य आणि लोकसंग्रह हे सारे अगदी त्यांच्याकडून मिळालेली अनमोल देणगी आहे. उत्तम मिमिक्री आर्टिस्ट असलेले माझे वडील आर. कृष्णमूर्ती यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वातला सर्वात मोठा पैलू म्हणजे त्यांच्या हातात असलेली अन्नपूर्णा आणि सढळ हाताने सर्वांना खाऊ घालणं. मी त्यांना अन्नपूर्णाच म्हणते. कारण गरीबश्रीमंत, आपलापरका हा भेद न बाळगता अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्यालाही ते प्रेमाने खाऊ घालतात.लहानपणची आठवण म्हणजे वेगवेगळ्याप्रकारे ते विविध पदार्थ बनवून आम्हाला ओळखायला सांगायचे की त्यात काय जिन्नस आहे. त्यामुळेच विविध पदार्थांचे ज्ञान आणि त्यांचे गुणधर्म आम्हाला ओळखता येऊ लागलं आणि योग्य पद्धतीने जेवणात त्याचा वापर करण्यास मार्गदर्शन मिळालं. साधेचसं पण सुग्रास भोजन असावं आणि 'अन्न हे पूर्णब्रह्म' खऱ्या अर्थाने जगणाऱ्या आणि अन्नपूर्णेसारखीच सर्वांची जिव्हा तृप्त करणाऱ्या माझ्या पित्याला मनापासून वंदन.
- पद्मश्री राव, लेखिका
प्रत्येकाच्या जीवनात आई इतके बाबासुद्धा महत्त्वाचे असतात. आपल्या घरच्यांसाठी, मुलांसाठी आपण काहीतरी करतोय याची पुसटशी जाणीवही बाबा त्यांच्या चेहऱ्यावर येऊ देत नाही. कुठलीच अपेक्षा न ठेवता तो आपल्या मुलांसाठी झटत असतो. आपल्यावरील प्रेम तो व्यक्त करत नाही याचा अर्थ असा नाही की त्याचं आपल्यावर प्रेम नाही.अनेक किस्से आहेत जेव्हा माझे बाबा माझ्या पाठिशी उभे राहिले. पण एक किस्सा मी आवर्जून सांगेन. मी एका हॉस्पीटलमध्ये इंटर्नशीप करत होते. नाईट शिफ्टमध्ये मला एका पेशंटने धमकावलं. त्यावेळी मी खूप घाबरले होते. मी सर्वात पहिला कॉल केला तो बाबांना. त्यांनी मला धीर दिला. परिस्थितीत कशीही असो पण घाबरायचं नाही हे त्यांनी मला शिकवलं. त्यांच्यामुळेच मी समस्यांवर मात करायला शिकले. या घटनेनंतर ते एकदा मला भेटायला हॉस्पीटलमध्ये पण आले होते. म्हणून आईसारखे बाबा देखील माझा आधार आहेत.
- शिल्पा घोबळे, डॉक्टरमुलगा हा अधिक आईच्या जवळ असतो असं म्हटलं जातं. पण मी आईसोबतच पप्पांच्या देखील जवळ आहे. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. माझे बाबा माझ्यासाठी सुपरहिरो आहेत. फक्त माझेच बाबा नाही तर सगळ्यांचेच बाबा आपापल्या परीनं सुपरहिरो आहेत.मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी ते आपल्या इच्छा-आकांक्षाचे बलिदान देतात. पण मुलं मोठी होताच वडिलांच्या प्रेमाला बंधन समजतात. पण वडिलाची पिडा त्याच्याजागी गेल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघा. मग कळेल की आपण कुठे चुकत आहोत.
- किरण सावलसंग, इंजिनियर
चित्रपटात आमिर खान कसा म्हणतो, पापा कैहते है बडा नाम करेगा... पण माझे पप्पा म्हणतात माझी मुलगीच माझं नाव मोठं करतेय. फादर्स डे वर्षातून एकदा साजरा करतात. पण माझ्यासाठी फादर्स डे रोजच असतो. आई-बाबांशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचारच नाही करू शकत. त्याशिवाय एक दिवस गेला तरी चुकचुकल्यासारखं होतं.मला अजून आठवतं लहान असताना बाबा रोज गार्डनमध्ये घेऊन जायचे. आम्ही राहायचो त्या चाळीत खेळायला मिळायचं नाही. त्यामुळे बाबा ऑफिसमधून आले की आम्हा सर्व पोरांना गार्डनमध्ये घेऊन जायचे. ते खूप थकलेले असायचे तरीही माझा हट्ट पूर्ण करायचे. जेवढं ते माझ्यावर प्रेम करतात तेवढे ते शिस्तप्रिय देखील आहेत.
- श्रद्धा वडके, अकाऊंटंटलग्नानंतर मला माझ्या बाबांचं महत्त्व खऱ्या अर्थानं कळलं. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि आजही देत आहेत. मी आयुष्यात जे काही कमवलं ते त्यांच्यामुळेच.

 


माझ्या यशामागे त्यांचाच हात आहे. कठीण प्रसंगांमध्ये ते सावलीसारखे माझ्या पाठिशी उभे होते. माझ्यासाठी ते सुपरहिरो आहेत.
- सीमा शिंदे-भोसले, गृहिणीमाझे बाबा सुपरहिरो आहेत. या सुपरहिरोचा असाच एक किस्सा मला आठवलाय. लहान असताना मी माझ्या वर्गातल्या मिञ-मैञिणींना सांगायचे की माझे बाबा खूप ताकदवान आहेत. ते रेल्वेचा एक डबा सहस उचलू शकतात. थोडी अतिशयोक्ती झाली पण ते पूर्णपणे असत्य नव्हतं.पण खरं सांगू मोठी होत गेल्यावर कळालं की त्यांच्या खांद्यावर जो ओझं आहे ते रेल्वे डब्याच्या वजनाहून किती तरी पटीनं अधिक आहे. माझं आणि बाबांचं ट्यूनिंग वेगळं आहे. माझे मिञ आहेत ते. बाबा म्हणून तर करतेच पण एक माणूस म्हणून देखील मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. 

- केतकी जाधव

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा