Advertisement

'एसएफए'तर्फे आता शाळांना मिळणार दहा लाखांचा निधी


'एसएफए'तर्फे आता शाळांना मिळणार दहा लाखांचा निधी
SHARES

देशभरातील प्रतिभावंत खेळाडूंना शोधणे, त्यांच्या भविष्यासाठी क्रीडा प्रकारांचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यातील गुण हेरून त्यांना भविष्यातील चॅम्पियन बनवणे या उद्देशाने स्पोर्टस् फॉर ऑल (एसएफए) तर्फे यंदाही मुंबईतील मल्टी डिसिप्लनरी चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे.


एकूण १० लाखांचे पारितोषिक

यंदा या स्पर्धेत एकूण १० लाखांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा यात उत्कृष्ठ दहा शाळांना हे बक्षीस दिले जाणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकास ३ लाख, द्वितीय २ लाख, तृतीय १.५० लाख आणि चौथ्या ते दहाव्या क्रमांकास प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.


कुठे होणार स्पर्धा

२०१५ साली स्पोर्टस् फॉर ऑलने पहिल्या अॅडिशनलला सुरुवात केली होती. यंदा हे तीसरे वर्ष आहे. या स्पर्धेत भारतातील कोणतीही शाळा सहभागी होऊ शकते. ही स्पर्धा मुंबईत २ ते १७ डिसेंबर दरम्यान नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियम येथे खेळवली जाईल आणि अॅथलेटीक्ससाठी चर्नीरोड येथील युनीव्हरसिटी ग्राऊंड आणि हॉकीसाठी महिंद्रा ग्राऊड असणार आहे.

एसएफएने पहिल्यांदा चॅम्पियनशिप निधी देऊ केला आहे. त्यामुळे शाळा आपल्या आवारात खेळासाठी अधिक चांगल्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत नवीन कुशल प्रशिक्षकांची नेमणूक करू शकतील.


काय आहे याचे नियम?

या स्पर्धत एकूण ३५ हजार शाळेतील विद्यार्थी सहभागी होतात. उच्च दर्जाच्या शाळेपर्यंत ते महापालिकेच्या शाळांचा देखील यात सहभाग असतो. प्रत्येक शाळेतील किमान अंदाजे ६००-७०० विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. प्रत्येक विद्यर्थ्यांना यात सहभागी होण्यासाठी २०० रुपये रजीस्टर फी आहे. तर, पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. ज्या शाळांना नोंदणी करायची असेल त्यांनी ५ नोव्हेबर पर्यंत www.sfanow.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.


स्पर्धेत कोणकोणत्या खेळांचा समावेश?

स्पोर्टस फॉर ऑलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मल्टी डिसिप्लिन चॅम्पियनशिपमध्ये एकूण २५ क्रीडा प्रकारांचे खेळ खेळवले जातात. यंदा यामध्ये दोन क्रीडा प्रकार वाढवण्यात आले आहेत. ऑलिम्पिक खेळाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या खेळांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. विद्यार्थी बास्केटबॉल, फुटबॉल, हॅंडबॉल, हॉकी, तिरंदाजी आणि कबड्डी सारख्या २३ खेळांमध्ये सहभागी होतील आणि आपल्या शाळांना विजेतेपद पटकावून देतील. या स्पर्धेत ऑलिम्पिक दर्जाच्या पायभूत सुविधा आणि सामग्री वापरल्या जाणार आहेत.


२०१८ पर्यंत ८ शहरांत पोहचणार

एसएफएतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा २०१८ पर्यंत ८ शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मुंबई, तेलंगणासह पुणे, बंगळुरू, कोलकत्ता, आंध्रप्रदेश, अहमदाबाद, विशाखापट्टणम या शहरांतदेखील ही स्पर्धा आयोजित केली जाईल.


खेळांना पुरक वातावरण नाही. अपुरी मैदाने आणि पायाभूत सुविधांचा अभाव, सुरक्षिततेची सोय नसून जुनी प्राधिकरण प्रक्रिया, रेकॉर्ड व्यवस्थित न करणे यांसारख्या कारणांमुळे तरुण खेळापासूंन दूर जातो. एसएफएद्वारे आम्ही शाळांबरोबर सलंग्नितपणे कार्य करतो, त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून खेळाचा अंतर्भाव करण्यास मदत करतो. यावेळी आम्ही भारतातील प्रतिभावान, हुशार खेळाडू शोधण्याचे कार्यही पार पाडतो, भविष्यात ऑलिम्पिकसाठी आपल्या देशाची उभारणी करत आहोत.

- ऋषीकेश जोशी, संस्थापक, एसएफए


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा