Advertisement

सीसीअाय स्नूकरमध्ये १२ वर्षांच्या शाहयान राझमीने जिंकली मने


सीसीअाय स्नूकरमध्ये १२ वर्षांच्या शाहयान राझमीने जिंकली मने
SHARES

कौशल्याची कसोटी पाहणाऱ्या स्नूकरसारख्या खेळात एक छोटासा चिमुरडा दिग्गजांच्या स्पर्धेत सहभागी होतो. पाहतापाहता पहिल्याच फेरीत तो भल्याभल्यांची भंबेरी उडवतो. अापल्या खेळाने सर्वांनाच मंत्रमुग्ध करून टाकतो. ही किमया करून दाखवली अाहे १२ वर्षांच्या शाहयान राझमीने. माझगांव येथील सेंट मेरी अायएससी स्कूलमध्ये सातवीत शिकणाऱ्या शाहयाननं क्रिकेट क्लब अाॅफ इंडिया इथं सुरू असलेल्या सीसीअाय अखिल भारतीय स्नूकर स्पर्धेत पुण्याच्या योगेश शर्मा याचा ३-१ असा धुव्वा उडवत सर्वांची मनं जिंकली अाहेत.


शाहयानची दुसऱ्या फेरीत मजल

१२ वर्षांच्या शाहयानने सुरुवातीपासून अाश्वासकपणे अाणि सातत्यपूर्ण खेळ करत अापल्यापेक्षा वयाने अाणि अनुभवाने कितीतरी मोठ्या असलेल्या पुण्याच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी करत पहिली फ्रेम जिंकली. दुसऱ्या फ्रेममध्ये मात्र त्याचं खेळावरचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर डाव्या हाताने खेळणाऱ्या शाहयानने पुढील दोन्ही फ्रेम जिंकून पहिल्या फेरीचा हा सामना ७७-२९, ९-६८, ६०-२२, ६१-५१ असा जिंकून दुसऱ्या फेरीत मजल मारली.


सोलापूर, चिपळूणच्या स्पर्धकांचीही सुरेख कामगिरी

सोलापूरचा लियाकत अली शेख अाणि चिपळूणचा सिद्धेश मुळे या छोट्या शहरांमधून अालेल्या स्पर्धकांनीही अापली छाप पाडत दमदार कामगिरी केली. लियाकत अलीने गुजरातच्या जयदीप सोनीचा ३-० (५३-९, ७८-२३, ७६-१६) असा धुव्वा उडवला. सिद्धेश मुळेमे पुण्याच्या संचित जामगावकरचा ३-० असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा