Advertisement

वसई-विरार मॅरेथॉनमध्ये 18 हजार धावपटू धावणार


वसई-विरार मॅरेथॉनमध्ये 18 हजार धावपटू धावणार
SHARES

मुंबई मॅरेथाॅनची रंगीत तालीम म्हणून अोळखल्या जाणाऱ्या वसई-विरार मॅरेथाॅन शर्यत 10 डिसेंबरला रंगणार असून त्यामध्ये जवळपास 18 हजार धावपटूंनी सहभाग नोंदवला अाहे. विविध गटांत होणाऱ्या या स्पर्धेत विजेत्यांना जवळपास 40 लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार अाहेत. पूर्ण मॅरेथाॅनमध्ये 640, अर्ध मॅरेथाॅनमध्ये 4000, 11 किमी. अंतरासाठीच्या शर्यतीत 2000 धावपटू सहभागी होणार अाहेत. त्याचबरोबर 1.5 किमी, 3 किमी, 5 किमी, 7 किमी अाणि 11 किमी तसेच धम्माल धाव (4 किमी) या विविध गटांत धावपटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला अाहे.


मंदिरा बेदी, राहुल बोस ब्रँड अॅम्बेसेडर

अाॅलिम्पियन ललिता बाबर, अंजू बाॅबी जाॅर्ज यांसारखे दिग्गज खेळाडू ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडणाऱ्या यंदाच्या वसई-विरार महापौर मॅरेथाॅन स्पर्धेसाठी बाॅलीवडू अभिनेते अाणि नेहमीच मॅरेथाॅन स्पर्धांना प्रोत्साहन देणाऱ्या मंदिरा बेदी अाणि राहुल बोस यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे.


विजेत्याला 2.5 लाखांचे बक्षिस

पुरुषांच्या पूर्ण मॅरेथाॅनमध्ये विजयी ठरणाऱ्या अॅथलिट्सला 2.5 लाख रुपयांचे इनाम देण्यात येईल. तसेच महिलांच्या अर्धमॅरेथाॅन गटातील विजेतीला 1.25 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येईल. एलिट धावपटूंव्यतिरिक्त पाच विविध गटातील विजेत्यांसाठी तसेच वसई-विरार पट्ट्यातील धावपटूंवर रोख बक्षिसांचा वर्षाव केला जाणार अाहे.


रशपाल सिंग, मोनिका अाथरे यांच्या कामगिरीवर लक्ष

पुण्यातील अार्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचा रशपाल सिंग या मोसमात चांगल्या फाॅर्मात असून विजेतेपदासाठी तो प्रबळ दावेदार समजला जात अाहे. त्याच्यासमोर अार्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचा भरम प्रकाश, अनू सथ्यादास यांचे अाव्हान असेल. महिलांमध्ये अनेक प्रतिष्ठेच्या महिलांची जेतेपदे पटकावणारी नाशिकची धावपटू हिला स्वाती गाढवे, मोनिका राऊत, मनीषा साळुंखे यांचा कडवा प्रतिकार सहन करावा लागेल.

संबंधित विषय
Advertisement