मुंबई मॅरेथॉनमध्ये २३०० धावपटूंवर वैद्यकीय उपचार


  • मुंबई मॅरेथॉनमध्ये २३०० धावपटूंवर वैद्यकीय उपचार
SHARE

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या ४४ हजार ४०७ स्पर्धकांपैकी २३०० स्पर्धकांवर 'एशियन हार्ट इन्स्टिट्यूट'च्या डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय मदत लागणाऱ्या धावपटूंची संख्या कमी होत आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये एशियन हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे स्पर्धकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली होती. मागील १४ वर्षांपासून मुंबई मॅरेथॉनमध्ये एशियन हार्ट इन्स्टिट्यूट स्पर्धकांना तत्काळ वैद्यकीय मदत देत आहे.

या मॅरेथॉनदरम्यान, २ हजार‌ ३०० जणांना तात्कळ वैद्यकीय उपचार देण्यात आले. या टीममध्ये ५०० डॉक्टर आणि वैद्यकीय कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे ११ कार्डियॅक रुग्णवाहिका, ८ मोबाईल रुग्णवाहिका, सुरूवातीच्या आणि शेवटच्या पॉईंटवर २ बेस कॅम्प, ११ वैद्यकीय सहाय्यता केंद्र देखील उभारण्यात आलं होतं.६ धावपटूंना डी-हायड्रेशनमुळे त्रास झाला. त्यापैकी चौघांना वैद्यकीय मदत देऊन जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं.

- डॉ. विजय डिसिल्व्हा, वैद्यकीय संचालक, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट


दोघांना गंभीर त्रास

डी-हायड्रेशनचा त्रास झालेल्या धावपटूंना इन्ट्राव्हेनस फ्लूइड थेरपी देण्यात आली. काही धावपटूंवर फिजीओथेरपी करण्यात आली. एका व्यक्तीला रस्त्यात अचानक चक्कर आली. त्याच्या हृदयाचे ठोके कमी झाले होते. या व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली. काही वेळाने ही व्यक्ती शुद्धीवर आली. त्यानंतर त्याला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.

तसंच, मॅरेथॉन संपल्यावर एका धावपटूला पॅरेलेसिसचा अटॅक आला होता. त्यालाही बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. प्रमोद सिंह गीरासे आणि सुकेश काब्रा अशी या दोघांची नावे आहेत.


यावर्षी फक्त ५ टक्के लोकांना वैद्यकीय मदतीची गरज लागली. आमच्या टीमने उत्तम कामगिरी केली. वैद्यकीय मदत हवी असणाऱ्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. यावर्षी एकाही धावपटूचा मृत्यू झाला नाही.

- डॉ निलेश गौतम , एशियन हार्ट इन्स्टिट्यूटहेही वाचा-

मुंबई मॅरेथाॅनवर यंदाही इथियोपियाचं वर्चस्व, साॅलोमन डेक्सिसा, अमाने गोबिबा यांना विजेतेपद

हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी झेंडा, महिलांमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधव, मोनिका आथरेची बाजी

जयपूर फुट घालून वीर दौडले चार...


संबंधित विषय
ताज्या बातम्या