मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुसऱ्या 'वॉटर कप'ची घोषणा

 Pali Hill
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुसऱ्या 'वॉटर कप'ची घोषणा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुसऱ्या 'वॉटर कप'ची घोषणा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुसऱ्या 'वॉटर कप'ची घोषणा
See all

मुंबई - फिल्म अभिनेता आमिर खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या पाणी फाऊंडेशन या संस्थेतर्फे आता 'वॉटर कप'चा दुसरा अध्याय सुरु करण्यात आला आहे. यासंदर्भात सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतरित्या घोषणा केली. जेव्हा अशा प्रकारचा कार्यक्रम सुरु केला तेव्हा 3 तालुक्यात सुरु केला होता. त्या तालुक्यांनी पाण्याची 1,368 कोटी लीटर प्रती वर्ष इतकी क्षमता विकसित केली. या चांगल्या अनुभवामुळे आता पु्न्हा एकदा वॉटर कपचा दुसरा अध्याय सुरु करण्यात आलाय. हा 'वॉटर कप' राज्यातील 30 तालुक्यांसाठी असणार आहे. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी 31 जानेवारी 2017 पर्यंत फॉर्म भरुन पाठवायचे आहेत. यावेळी या स्पर्धेसाठी आमिर खान यांची पत्नी किरण राव यांनी मराठी गाणेही गायले आहे. तसेच या गाण्यामध्ये मराठी सिनेस्टार्स आहेत त्याचंसोबत सैराट फिल्मचे रिंकू राजगुरु, नागराज मंजुळे, अक्षय ठोसर, अजय-अतुल हेही व्हिडियोमध्ये झळकले आहेत.

Loading Comments 

Related News from क्रीडा