रविवारी जुहूत हाफ मॅरेथॉनचं आयोजन

 Juhu
रविवारी जुहूत हाफ मॅरेथॉनचं आयोजन

जुहू - हाफ मॅरेथॉनचं आयोजन रविवारी जुहूत करण्यात आलंय. यामध्ये चार हजार धावपटू सहभाग घेणार आहेत. (GETFIT) आणि (RCBA) यांच्या वतीने या मॅरेथॉनचं आयोजन केलं आहे. मॅरेथॉनची सुरुवात भाईलाल पटेल मैदानापासून होणार आहे. उत्तम आरोग्य आणि फिटनेस राखणे हा या मॅरेथॉनचा उद्देश आहे.

हाफ मॅरेथॉन (21.097 किमी), 10 किमी आणि 5 किमी अशा तीन गटात स्पर्धक सहभागी होणार आहेत. मुंबई उपनगर जिल्हा अ‍ॅथलेटीक संघटना (MSDAA) कडून या स्पर्धेला मान्यता मिळाली आहे. पाच वयोगटात होणाऱ्या या स्पर्धेतल्या विजेत्यांना एकूण सात लाख रुपयांचा निधी दिला जाईल. तर 10 किमी आणि 5 किमीच्या मॅरेथॉनमध्ये 15 आणि 12 वयोगटातील धावपटूंना सहभागी होता येणार आहे. तर हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास 18 वर्षांची मर्यादा आहे.

Loading Comments