कामगाराच्या मृत्युबद्दल कंत्राटदारावर गुन्हा


SHARE

कामाठीपुरा - कामाठीपुरा परिसरातल्या अमितुला इमारतीची दुरुस्ती सुरू असताना चौदाव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. शमसुद्दीन मोहम्मद (40) असं या कामगाराचं नाव आहे. अचानक तोल गेल्यानं तो खाली पडला. अन्य कामगारांनी त्याला तातडीनं जे. जे. रुग्णालयात नेलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही काळजी न घेतल्यानं नागपाडा पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या