टेनिस स्पर्धेत अधिरीत आवळची आगेकूच

  Mumbai
  टेनिस स्पर्धेत अधिरीत आवळची आगेकूच
  मुंबई  -  

  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे आयोजित केलेल्या 11 व्या 'रमेश देसाई मेमोरियल अंडर-12 टेनिस स्पर्धे'त मुलांच्या गटात तामिळनाडूच्या अधिरीत आवळ याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आगेकूच केली आहे. ही स्पर्धा जी.ए. रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथील टेनिस कोर्टवर खेळवण्यात आली.

  या स्पर्धेत पहिल्या फेरीत तामिळनाडूच्या व बिगरमानांकित अधिरीत आवळने चौथ्या मानांकित हरियाणाच्या वंश नांदलचा 7-5, 6-0 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. कर्नाटकच्या अव्वल मानांकित आयुष भट याने आपलाच राज्य सहकारी मुस्तफा राजाचा 6-1, 6-1 असा तर, बाराव्या मानांकित व महाराष्ट्राच्या मानस धामणे याने तेलंगणाच्या विनीत मूत्यालाचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 6-1 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महाराष्ट्राच्या जैष्णव शिंदेने अंशुल सातवचा 3-6, 7-5, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला.

  तर मुलींच्या गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या कायरा शेट्टीने मान्या बारंगेचा 6-3, 6-0 असा तर, महाराष्ट्राच्या अन्या जेकबने पश्चिम बंगालच्या तारू जोशीचा 6-1, 6-3 असा सहज पराभव केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.