एअर इंडियाने मारली बाजी

 Mumbai
एअर इंडियाने मारली बाजी

मुंबई - एमएफडीए लीगमधील इलीट डिवीज़न मॅचमध्ये एअर इंडियाने केंकरे एफसीवर 2-0 ने विजय मिळवला. रोमांचक अशा ठरलेल्या सामन्यात एअर इंडियाच्या विजय शेट्टी आणि आरोन डिसूजा यांनी चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या हाफमध्ये गोल न करू शकलेल्या एअर इंडियांने दुसऱ्या हाफमध्ये चांगली कामगिरी करत बाजी मारली. तसेच परेलच्या सेंट झेव्हिअर मैदानावर सेंट जोसेफ एफसी आणि विरारमध्ये खेळवण्यात आलेला सामना अर्निणीत राहिला. तर दुसऱ्या सामन्यात विव्यू स्पोर्टस् क्लबने केंकरे U-16 ला 3-0 ने पराभूत केले. तुषार कमानी याने दोन गोल तर तेज बगायतकर यांने एक गोल केला.

Loading Comments