Advertisement

एअर इंडियाचा संघ अजिंक्य


एअर इंडियाचा संघ अजिंक्य
SHARES

मुंबई - मागील 41वर्षांपासून गजानन क्रीडा मंडळ आणि कौंतेय प्रतिष्ठानच्या वतीने कब्बड्डी स्पर्धा आयोजित केल्या जातात. या वर्षीची कबड्डी स्पर्धा 18 डिसेंबर रोजी वामन दुभाषी मैदान, विलेपार्ले येथे संपन्न झाली. एअर इंडियाच्या संघानं विजेतेपदाचा मान पटकावला.
14डिसेंबरपासून सुरू झालेल्या या व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत 12 व्यावसायिक संघांचा समावेश होता. स्पर्धेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी यांचा सहभाग लाभला होता. कौंतेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष कौंतेय देशमुख, गजानन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, मुंबई उपनगर संघ कार्यकारी सदस्य आणि राष्ट्रीय पंच भरत संघानी, प्रशांत भगत आदीही अंतिम सामना पाहण्यास उपस्थित होते. अंतिम सामना एअर इंडिया विरुद्ध महिंद्रा अँन्ड महिंन्द्रा यांच्यात रंगला. अटीतटीच्या लढतीत एअर इंडिया संघाने महिंद्रा अँन्ड महिंन्द्रावर३७-३२ असा विजय मिळवला. मॅन ऑफ द मॅचचा किताब महिंद्रा अँन्ड महिंद्राच्या निलेश साळुंखेने पटकावला, तर उत्तम चढाईसाठीचा पुरस्कार एअर इंडियाच्या सिद्धार्थ देसाईनं पटकवला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा