Advertisement

अल बरकतने पटकावली हॅरिस ढाल


अल बरकतने पटकावली हॅरिस ढाल
SHARES

डावखुरा फिरकी गोलंदाज सौद मन्सूरीने पाच विकेट्स टिपत अप्रतिम कामगिरी केल्यामुळे स्वामी विवेकानंदला पहिल्या डावांत अवघ्या १७९ धावांवर रोखण्यात अल बरकत इंग्रजी माध्यम शाळेने यश मिळवले. त्यामुळे पहिल्या डावातील अाघाडीच्या बळावर अल बरकतने १२१व्या पर्वातील हॅरिस ढालवर नाव कोरले.


सौद मन्सूरी, नौफिल रोझानीची सुरेख गोलंदाजी

बाॅम्बे जिमखान्यावर रंगलेल्या या सामन्यात अल बरकतने पहिल्या डावात ३७४ धावा उभारल्यानंतर या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना स्वामी विवेकानंदची सुरुवात खराब झाली होती. रिशी शाहने ६० धावा फटकावत प्रतिकार केला. सौद मन्सूरीने पाच तर नौफिलने दोन विकेट्स मिळवत अल बरकतला पहिल्या डावात अाघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.


अथर्व निगरे ठरला सर्वोत्तम फलंदाज

अल बरकतचा अथर्व निगे हा या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज ठरला. त्याने ५ लीग सामन्यांमध्ये ३५५ धावा फटकावल्या. हिमांशू सिंग याला सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात अाले. त्याने चार डावांत २९० धावा अाणि ११ विकेट्स अशी कामगिरी नोंदवली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा