Advertisement

मुंबईच्या कुश भगतला राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक


मुंबईच्या कुश भगतला राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक
SHARES

मुंबईच्या कँडिडेट मास्टर कुश भगत याने अापल्या शिरपेचात मानाचा अाणखी एक तुरा रोवला अाहे. भुवनेश्वर येथील केअायअायटी कॅम्पस इथं झालेल्या सातव्या अखिल भारतीय राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत कुश भगत याने मुलांच्या ९ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावण्याची किमया केली अाहे. मुंबईतील अमेरिकन स्कूलमध्ये शिकणाऱ्या अाणि दक्षिण मुंबई बुद्धिबळ अकादमीत (एसएमसीए) प्रशिक्षणार्थी असलेल्या कुशने मुंबईतील स्पर्धांमध्ये अापली छाप पाडली होती. त्यानंतर अाता नऊ फेऱ्यांमध्ये ७.५ गुणांसह त्याने राष्ट्रीय शालेय जेतेपदालाही गवसणी घातली.


समान गुणसंख्येनंतरही कुश ठरला अजिंक्य

कुशच्या खात्यात १३९२ रेटिंग गुण असून अांध्र प्रदेशच्या तानिश साई कावुरू यानेही १३९२ रेटिंग गुण मिळवले अाहेत. योगायोगाची बाब म्हणजे, ९ वर्षांखालील गटात दोघांनीही समान ७.५ गुण मिळवले होते. मात्र प्रगत गुणांच्या अाधारे मुंबईच्या कुशला अजिंक्यपदाचा मानकरी ठरवण्यात अाले.


सुहानी लोहियाला रौप्यपदक

मुंबईची महिला कँडिडेट मास्टर सुहानी लोहिया हिने मुलींच्या ९ वर्षांखालील गटात रौप्यपदक पटकावले. धीरूबाई अंबानी शाळेत शिकणाऱ्या सुहानी अाणि कर्नाटकच्या शेफाली ए. एन. हिने समान ७.५ गुण मिळवले होते. पण सुहानीला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.



अनुग्रह जयसिंगचा रौप्यवेध

कॅम्पेन स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुंबईच्या अनुग्रह जयसिंग यानेही मुलांच्या १७ वर्षांखालील गटात रौप्यपदकाचा वेध घेतला. या स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घालण्यासाठी अनुग्रहला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.


हेही वाचा - 

मुंबईत रंगणार राष्ट्रीय अंध बुद्धिबळ स्पर्धा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा