Advertisement

संघर्ष आणि नवशक्ती यांना कबड्डी स्पर्धेचं अजिंक्यपद


संघर्ष आणि नवशक्ती यांना कबड्डी स्पर्धेचं अजिंक्यपद
SHARES

खारमध्ये झालेल्या आमदार-नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेत संघर्ष क्रीडा मंडळातील पुरुष आणि नवशक्ती क्रीडा मंडळातील महिला गटाने बाजी मारली. संघर्ष क्रीडा मंडळ, घाटकोपर आणि नवशक्ती क्रीडा मंडळ, चेंबूर यांनी अनुक्रमे साहसी कला क्रीडा मंडळ चेंबूर आणि शिवनेरी क्रीडा मंडळ, घाटकोपर यांच्यावर सहज विजय मिळवला. स्पर्धेतील सर्वोत्तम ठरलेल्या पंकज भोसलेने साहसी कला क्रीडा मंडळची दाणादाण उडवली. त्याच्या वेगवान चढायांना त्याने ताकदीची जोड देत प्रत्येक वेळा अडथळे सहज पार केले. परिणामी संघर्ष क्रीडा मंडळला मध्यंतराला 18-3 अशी भक्कम आघाडी घेता आली आणि अंतिमतः 32-12 असा विजय मिळवता आला.

महिलांची अंतिम लढत तेवढी एकतर्फी झाली नाही. नवशक्तीची मध्यंतराची 16-12 अशी आघाडी ही जरी निर्णायक नसली, तरी त्यांचा संघ भारी होता हे स्पष्ट झाले होते. शिवनेरीच्या मुली अननुभवी होत्या. त्यातच शिवनेरीतल्या आघाडीच्या फळीतील खेळाडू रुपाली महाडिकच्या या आक्रमक खेळाडूने आपली छाप पाडत नवशक्तीला 30-18 असा विजय मिळवून दिला.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान पंकज भोसले (संघर्ष), पूजा जाधव (नवशक्ती) यांना मिळाला. उत्कृष्ट चढाईपटूचा पुरस्कार अक्षय शेवडे (साहसी) आणि रुपाली महाडिक (शिवनेरी), उत्कृष्ट बचावपटूचा पुरस्कार विशाल धावडे (संघर्ष) आणि स्नेहल मोरे (शिवनेरी) यांना मिळाला. शिवसेना नेते, खासदार आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष गजानन किर्तीकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा