आमदार-नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेचा थरार

Khar
आमदार-नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेचा थरार
आमदार-नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेचा थरार
See all
मुंबई  -  

ओम भारत क्रीडा मंडळ आयोजित आमदार-नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात साहसी क्रीडा केंद्र चेंबूरने पोयसर जिमखाना (कांदिवली) संघावर 27-23 गुणांनी विजय मिळवला. साहसी गटातील अक्षय सावेकर, रोषण पवार आणि अभिषेक नर यांच्या चतुरस्त्र खेळामुळे त्यांना हा विजय मिळाला. या लढतीत प्रतिस्पर्धी संघावर 2 लोन चढवले. तर तीन वेळा सुपर कॅचचे गुण मिळवले. अक्षय सावेकर याने एकाच चढईत 3 खेळाडू बाद केले. पोयसर जिमखान्यासाठी आतिश शिंदे याने एकदा एकाच चढाईत 4 गुण मिळवले. पूर्वार्धात पोयसर संघ 7-15 असा पिछाडीवर होता आणि हीच पिछाडी त्यांना महागात पडली. उत्तरार्धात आतिश आणि परेश देवळेकर यांनी चढाई-पकडीचा दमदार खेळ करत 16 गुण मिळवले. पण संघाचा पराभव टाळण्यात मात्र ते अपयशी ठरले. पुरुष गटाच्या आणखी एका लढतीत ओम साई क्रीडा मंडळाने (बोरीवली) घाटकोपरच्या पंचवटी क्रीडा मंडळाला 31-18 असे 13 गुणांनी हरवले. कुलदीप माईनकर आणि नितीन करळ हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पंचवटीच्या कुणाल लंबे आणि सुशांत पाटेकर यांनीच थोडाफार प्रतिकार केला.

महिला गटात महात्मा फुले (घाटकोपर) संघाने बोरीवलीच्या ओम नवमहाराष्ट्र संघावर 32-21 असा विजय मिळवला. पूर्वार्धात सुरुवातीलाच महात्मा फुले संघाच्या शुभदा खोत आणि स्वाती फणसे यांनी दमदार खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर दोन लोन चढवले होते. नवमहाराष्ट्र संघाची करिष्मा म्हात्रे उशिरा मैदानात उतरली आणि पहिल्याच चढाईत दोन गडी बाद करून तिने संघाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र उत्साहात आक्रमक खेळ करण्याचा तिचा प्रयत्न महात्मा फुले संघाने हाणून पाडला. ओम नाव महाराष्ट्रसाठी प्रणाली गावडे आणि चेतना ताजने यांनी चांगला खेळ केला. आणखी एका लढतीत संजीवनी क्रीडा मंडळ भांडूप या संघाने एकतर्फी लढतीत नवख्या अश्विनी स्पोर्ट्स क्लब संघावर 41-10 असा मोठा विजय मिळवला. संजीवनी संघाची प्राची जैतापकर हिने प्रतिस्पर्धी संघाला पुरते नामोहरम केले. या लढतींना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.