अनन्या, क्रिपीचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश

  Mulund
  अनन्या, क्रिपीचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश
  मुंबई  -  

  नागपूरच्या अनन्या दुरुगकर आणि क्रिपी साजवन यांनी तीन सलग सामन्यांत चुरशीची लढत देत बुधवारी उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या 'महाराष्ट् राज्य सब-ज्युनिअर बॅडमिंटन'च्या मान्यतेने 'जयेश धुरी फाऊंडेशन'ने ही स्पर्धा कालिदास क्रीडा संकुल, मुलुंड येथे स्पर्धा आयोजित केली आहे.

  पहिल्या सामन्यात अनन्याला पराभव पत्कारावा लागला. पण नंतरच्या सामन्यात तिने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत पुण्याच्या संजाना आंबेकरला 11-15, 15-6, 15-7 अशा फरकाने हरवले. तर क्रिपी साजवानने शेवटच्या टप्प्यात खेळावर लक्ष केंद्रीत करुन रोमांचक लढतीत पुण्याच्या आरती चौगुलेवर 15-13, 14-15 आणि 15-13 अशा गुणसंख्येने विजय मिळवला.

  या स्पर्धेतील इतर सामन्यांमध्ये पुण्याच्या तारा शाह आणि नागपूरच्या निकिता जोसेफ या जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर मुंबई उपनगरमधील मुलींनी सेहर मेमन, आलिशा नाईक आणि मन्या अव्हलानी यांनी विजयी सलामी दिली. 15 वर्षांखालील मुलींच्या गटात साताऱ्याच्या आर्या देशपांडे, पुण्याच्या जान्हवी कानीतकर व अनन्या फडके यांनी पूर्व-उपात्य फेरीत विजय मिळवला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.