डॉ. अँटोनिओ डीसिल्व्हा शाळेत अँस्ट्रोटर्फ मैदान

  Dadar
  डॉ. अँटोनिओ डीसिल्व्हा शाळेत अँस्ट्रोटर्फ मैदान
  मुंबई  -  

  दादर - विद्यार्थ्यांना खेळाच्या अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी दादरमधील डॉ. अँटोनिओ डिसिल्व्हा शाळेत अँस्ट्रोटर्फ मैदान तयार करण्यात आले आहे. शनिवारी हॉकी ऑलिम्पियन्स मर्व्हिन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत या अँस्ट्रोठर्फचे उद्घाटन करण्यात आले.

  पुढील वर्षी शाळेला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी शाळेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. शालेय स्तरावरील हॉकी आणि फुटबॉलचे खेळाडू घडावेत, हा यामागचा उद्देश आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असे हे मैदान शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार आहे. त्याचबरोबर फुटबॉल व हॉकी प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. "शालेय अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणाची तासिका बंधनकारक असल्याने या मैदानांचा चांगला उपयोग होईल", असे मत शाळेचे ट्रस्टी अँडरिन डिसुझा यांनी व्यक्त केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.