Advertisement

फिफा वर्ल्डकपसाठी 13 हजार गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था


फिफा वर्ल्डकपसाठी 13 हजार गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था
SHARES

भारतात पहिल्यांदाच 'फिफा अंडर - १७ विश्वचषक' फुटबॉल स्पर्धा खेळवली जाणार आहे. नवी मुंबईत ही स्पर्धा रंगणार असल्याने महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यावेळी पालिकेच्या वतीने नवी मुंबईतील सुशोभिकरणावर देखील लक्ष देण्यात आले आहे. याचसोबत गुरुवारी ५ ऑक्टोबर रोजी स्मार्ट सिटी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 

१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा ६ ते २५ ऑक्टोबरदरम्यान नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर रंगणार आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने फुटबॉल प्रमी गर्दी करतील. या स्पर्धेसाठीची तयारी चोख व्हावी, म्हणून मनपा आयुक्त रामास्वामी यांच्या अध्येक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यावेळी शहरात वाहतूककोंडी होऊ नये यासाठी खास वाहनतळ बनवण्यात आले आहे.

सीवूडमधील गणपतशेट तांडेल मैदान, ग्रॅंड सेंट्रल पार्किंग, शिरवणे तसेच एमआयडीसीतील भूखंड ८, ८ बी, १३ बी, वंडर्स पार्क, उरण फाटा, एमआयडीसी रहेजा कन्स्ट्रक्शनचा भूखंड, खारघर लिट्ल वंडर मॉल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी एकूण १३ हजार वाहने उभी केली जाऊ शकतील, अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.



हेही वाचा - 

फिफा विश्वचषकात कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये? जाणून घ्या!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा