अाशुतोष साहाने पटकावला ज्युनियर मुंबई श्री किताब


SHARE

दादर येथील शिवाजी मंदिरात रंगलेल्या ज्युनियर मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या किताबासाठी हर्क्युलिस जिमचा अाशुतोष साहा अाणि चिन्मय शेजवळ यांच्यात कडवी चुरस रंगली होती. पंचांनीही या दोघांना पुन्हा एकदा रंगमंचावर बोलावून तुलना केली. पण चिन्मय शेजवळपेक्षा अाशुतोष हा किंचित सरस ठरला अाणि पंचांनी अाशुतोषला ज्युनियर मुंबई श्री किताबाचा मानकरी ठरवला. ज्युनियर मुंबई श्री किताब पटकावून अाशुतोषने अापण २३ जानेवारीला परभणी इथं होणाऱ्या ज्युनियर महाराष्ट्र श्री किताबासाठी प्रबळ दावेदार असल्याचा इशारा अापल्या अन्य स्पर्धकांना दिला अाहे. ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएसन व मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनतर्फे अायोजित करण्यात अालेल्या या स्पर्धेत छोट्या चणीच्या क्षितिज चव्हाण आणि प्रणय ढसाळ यांनीही प्रेक्षकांची मने जिंकून आपली छाप पाडली.इंद्रप्रकाश राव ठरला दिव्यांग श्री

या स्पर्धेदरम्यान अायोजित करण्यात अालेल्या दिव्यांग तसेच मास्टर्स आणि नवोदित मेन्स फिटनेस फिजिक या स्पर्धांनाही तूफान प्रतिसाद मिळाला. दिव्यांग मुंबई श्री स्पर्धेत पाठारे जिमकोचा इंद्रप्रकाश राव विजेता ठरला. नवोदित मेन्स फिटनेस फिजिकमध्ये शुभम कांडूने विजेतेपद पटकावले. अाता या स्पर्धेतून विजयी ठरलेले पहिले तीन शरीरसौष्ठवपटू परभणी इथं होणाऱ्या ज्युनियर महाराष्ट्र श्री स्पर्धेत मुंबई अाणि मुंबई उपनगर संघाचे प्रतिनिधीत्व करतील.


ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेतील गटविजेते -

क्षितिज चव्हाण (बाॅडी वर्कशाॅप, ५५ किलो), प्रणय ढसाळ (गज जिम, ६० किलो), अाकाश घोरपडे (स्टील बाॅडी, ६५ किलो), प्रसाद म्हामुणकर (फाॅर्च्युन फिटनेस, ७० किलो), चिन्मय शेजवळ (हर्क्युलिस जिम, ७५ किलो), अाशुतोष साहा (हर्क्युलिस जिम, ७५ किलोवरील).
किताब विजेता - अाशुतोष साहा (हर्क्युलिस जिम)


दिव्यांग मुंबई श्रीचे विजेते

प्रथम क्रमांक - इंद्रप्रकाश राव (पाठारे जिमको), दुसरा क्रमांक - मोहम्मद रियाझ खान (अार. गोल्ड जिम), तृतीय क्रमांक - दिलीप मारू (मायक्रो जिम).

संबंधित विषय