काय आहे सुनील छेत्रीचं मिशन २०१९ ?

काय आहे सुनील छेत्रीचं मिशन २०१९ ?
See all
मुंबई  -  

अंधेरी - भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांचे दोन दिवसाचे सराव सत्र बुधवारी आणि गुरुवारी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आले होते. या वेळी सुनील छेत्रीने प्रसार माध्यमांशी बातचित केली. 

"आपले पुढचे लक्ष्य एशिया कप 2019 असेल. म्यानमार सोबत होणारा सामना फार महत्त्वाचा आहे. कारण ही पात्रता फेरी आहे.

- सुनील छेत्री, कर्णधार, भारतीय फुटबॉल संघ

"कधी कधी अशी परिस्थिती येते की माझी टीम चांगलं प्रदर्शन करू नाही शकत. पण म्यानमार सोबतचा सामना आम्ही चांगल्या प्रकारे खेळू," असा विश्वासही छेत्रीने यावेळी व्यक्त केला. "लवकरच भारतीय फुटबॉल टीम कंबोडियासाठी रवाना होणार आहे," अशी माहिती सुनील छेत्रीने दिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.