Advertisement

'या' पालिका कर्मचाऱ्याची बातच काही और!


'या' पालिका कर्मचाऱ्याची बातच काही और!
SHARES

पालिका कर्मचारी म्हटलं, की समोर एक वेगळीच प्रतिमा उभी रहाते. कंटाळवाणे, कामचुकार, टाळाटाळ करणारे आणि उद्धट बोलणारे, अशी साधारण आपल्यासमोर प्रतिमा तयार झालेली असते. अर्थात, ही बाब सर्वांना लागू होऊ शकत नसली, तरी आपल्याला आलेल्या काही अनुभवांच्या आधारे तशी प्रतिमा आपोआपच तयार होते. मात्र राजेश मुदम या पालिका कर्मचाऱ्याची बातच काही और आहे!

मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी राजेश मुदम यांनी दक्षिण आशियाई व्हेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. श्रीलंकेत झालेल्या या स्पर्धेत 50 वर्षे वयोगटात विजय मिळवून मुदम यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे मुंबई महानगरपालिकेचे नाव दक्षिण आशियाई स्पर्धेत झळकले आहे. अंतिम फेरीत श्रीलंकेच्या चमुवर 3-0 अशा फरकाने मात करत मुदम आणि भारतीय टेबल टेनिस चमूने या अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

राजेश मुदम हे 1977 पासून टेबल टेनिस खेळतात. 1982 पासून ते महापलिकेच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यांची क्रीडा कोट्यातून नियुक्ती झाली आहे. सध्या ते महापालिकेच्या दक्षता विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते गेल्या 35 वर्षांपासून महापालिकेच्या टेबल टेनिस संघाचे नेतृत्व करत आहेत.


यापूर्वीही खेळली विश्वचषक टेबल टेनिस स्पर्धा

  • 2002 - स्वीझर्लंड
  • 2004 - जपान
  • 2006 - जर्मनी
  • 2010 - चीन
  • 2012 - स्वीडन

2011 मध्ये थायलंड येथे झालेल्या एशिया पॅसिफिक स्पर्धेत भारतीय संघाने उपविजेतेपद मिळवले होते. या संघात देखील मुदम यांचा समावेश होता. महाराष्ट्र संघाला अनेकवेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवून देण्यात मुदम यांचा मोलाचा वाटा आहे.



हेही वाचा -

मुंबई सुपर लीगमध्ये टॉप स्पिनर विजयी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा