मुंबई सुपर लीगमध्ये टॉप स्पिनर विजयी

  Worli
  मुंबई सुपर लीगमध्ये टॉप स्पिनर विजयी
  मुंबई  -  

  वरळी, एनएससीआय येथे सोमवारी झालेल्या पहिल्या मुंबई सुपर लीगच्या अंतिम सामन्यात टॉप स्पिनर संघाने दणदणीत विजय मिळवला. संघाच्या दिव्या महाजनने चांगली कामगिरी करत युवा सहकारी शृष्टी हलेंगडी आणि देव श्रॉफ यांच्या साथीने किंगपाँग संघाचा 5-3 अशा फरकाने पराभव करत पहिल्या मुंबई सुपर लीग टेबल टेनिस स्पर्धेत विजय मिळवला. 

  महिलांच्या एकेरी फेरीत दिव्याने आक्रमक खेळी करत किंग पाँगच्या प्रिती भोसलेला 3-0 ने (11-6, 11-1, 11-6) पराभूत केले. तसेच मिश्र दुहेरी फेरीत दिव्याच्या जोडीला निशांत कुलकर्णीने प्रतिस्पर्धी संघातील मुदित दाणी आणि प्रिती भोसले यांना 3-1 (12-10, 11-6, 3-11, 11-5) अशा फरकाने पराभूत केले. त्याआधी झालेल्या पुरुष एकेरीमध्ये निशांत कुलकर्णीला मुदित दाणीने 1-3 अशा फरकाने मात करत हरवले. पण ज्युनिअर मुलांच्या एकेरी फेरीत देव श्रॉफ ने 2-1 ने टॉपस्पिनर संघासाठी आघाडी घेत रेगन अल्बूक्युरकू याला 3-2 ने हरवत विजय मिळवला. तर ज्युनिअर मुलींच्या एकेरी फेरीत शृष्टीने मानसी चिमळूकरवर मात करत विजय मिळवला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.