Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

'नवोदित मुंबई श्री' स्पर्धेसाठी मुंबईतील खेळाडूंची जय्यत तयारी!


'नवोदित मुंबई श्री' स्पर्धेसाठी मुंबईतील खेळाडूंची जय्यत तयारी!
SHARES

उदयोन्मुख आणि नवोदित शरीरसौष्ठवपटूंसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या नवोदित मुंबई श्री या स्पर्धेची धमाल येत्या शुक्रवारी 24 नोव्हेंबरला लालबागच्या गणेशगल्लीत पाहायला मिळणार आहे. या शरीरसौष्ठव स्पर्धेत मंचावर आपल्या शरीरयष्टीचे प्रदर्शन करण्यासाठी मुंबईतील 200 पेक्षा अधिक खेळाडू जोरदार तयारी करीत आहेत.


नवख्या खेळाडूंसाठी स्पर्धेचे आयोजन

शरीरसौष्ठवपटूंच्या करिअरसाठी 'मुंबई श्री' हा महत्त्वाचा टप्पा असतो. आकर्षक शरीरयष्टी मिळवण्यासाठी प्रत्येक जण यामध्ये सहभागी होण्याचे स्वप्न बघत असतो. याच उद्देशाने नवोदित 'मुंबई श्री'चे आयोजन केले जाते. तरुणांमध्ये या स्पर्धेची भलतीच क्रेझ निर्माण झाली आहे. या स्पर्धेत उतरण्यासाठी मुंबतील प्रत्येक तरुण जोरदार तयारी करताना दिसत आहे. नवख्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रेटर मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांनी संयुक्तपणे रोख पुरस्कारही ठेवले आहेत.


विजेत्यांना पुरस्कार

या स्पर्धेतील विजेत्याला 'मुंबई श्री'सोबतच 11 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. ही स्पर्धा 55, 60, 65, 70, 75, 80 आणि 85 किलो वजनी गटात रंगणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक गटात पहिल्या पाच क्रमांकाना 3, 2.5, 2,1.5 आणि 1 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार असल्याचे मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर यांनी सांगितले.


स्पर्धकांची येथे होणार वजन तपासणी

'नवोदित मुंबई श्री'ला पीळदार देहयष्टी असलेल्या 200 पेक्षा अधिक तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संघटनेने 23 नोव्हेंबरला दुपारी 3 ते 5 यावेळेत अंधेरी पूर्वेकडील पंपहाऊस येथील फॉरच्युन फिटनेस येथे वजन तपासणीचे आयोजन केले आहे. याकरता इच्छुक स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी केले आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा