नागपाडाच्या मुलांची खालसावर मात


SHARE

बॉम्बे वायएमसीए फिजिकल एज्युकेशन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मस्तान वायएमसीए बास्केटबॉल टुर्नामेंटमध्ये नागपाडा बास्केटबॉल असोसिएशन संघाच्या खेळाडूंनी खालसा महाविद्यालयाला ७७-५९ ने मात देत मुलांच्या १८ वर्षाखालील गटातील उपांत्य फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा आग्रिपाडा येथे खेळवण्यात आली.


नागपाडाची शानदार खेळ

सुरुवातीपासून आक्रमक खेळी करत खालसा संघाने २-१ने आघाडी घेतली होती. पण थोड्यावेळाने नागपाडाच्या खेळाडूंनीदेखील तोडीस तोड उत्तर दिले. खालसा संघाने पुन्हा शानदार खेळ करत विजयासाठी प्रयत्न केले. पण प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या आक्रमकतेसमोर त्यांना यश मिळवता आले नाही.
या लढतीत नागपाडाच्या फैझान शेख, शेख राजा, नेहाल शेख यांनी गोल केले तर खालसाच्या साहील सिंग आणि शुभम लाड यांनी प्रत्येकी एक गोल केला.

इतर सामन्यात पुरुषांच्या गटात डॉन बॉस्को विरुद्ध घाटकोपर वायएमसीएमध्ये झालेल्या लढतीत डॉन बॉस्को संघाने ६२-४० अशा फरकाने विजय साकारत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या