अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट सामन्यांचं आयोजन


  • अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट सामन्यांचं आयोजन
SHARE

कांजूरमार्ग - येथील राॅनीचा वाडा भागातल्या मैदानावर श्रद्धा सबुरी मित्र मंडळाने निलेश मोरे या मंडळाच्या कार्यकर्त्याच्या स्मरणार्थ दिवस-रात्र अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय.

५ आणि ६ नोव्हेंबर या दोन दिवशी हे सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेत मुंबईतल्या नामांकित १६ संघांना प्रवेश देण्यात आला असून हे सामने चार ओव्हरचे असतील. विजेत्या संघाला २० हजार रुपये रोख आणि चषक, तर उपविजेत्या संघाला १० हजार रुपये रोख आणि चषक देऊन गाैरवण्यात येणार आहे. तसंच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही अाकर्षक चषक देऊन गाैरवण्यात येणार असल्याचं आयोजक विष्णू गाडे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या