राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचं आयोजन

 Pali Hill
राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचं आयोजन
राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचं आयोजन
See all

मुंबई - स्पोर्ट्स सिंडिकेट इंडिया प्रा. लि. तर्फे सिनको चषक महाराष्ट्र राज्य रोख परितोषिकांची कॅरम स्पर्धा २०१६चं आयोजन करण्यात आलंय. 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2016 या कालावधीत ना. म. जोशी मार्ग इथल्या म्युनिसिपल सेकंडरी स्कुलच्या मैदानात ही स्पर्धा होणार आहे. पुरुष एकेरी आणि महिला एकेरी अशा दोन गटात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

पुरुष एकेरी विजेत्याला 25 हजार रुपये, सिनको चषक आणि कॅरम बोर्ड बक्षीस म्हणून दिलं जाणार आहे. तर महिला एकेरी विजेत्याला १५ हजार रुपये, सिनको चषक आणि कॅरम बोर्ड असं बक्षीस दिलं जाणार आहे. ब्रेक टू फिनिश करणाऱ्या खेळाडूला ५०० रोख रक्कम आणि पारितोषिक अशा प्रकारे स्पर्धेमध्ये एकूण २ लाख रोख रक्कम आणि चषक प्रदान करण्यात येणार आहे.

Loading Comments