Advertisement

कॅथेड्रल अँड जॉन कॅनन संघाला अांतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद


कॅथेड्रल अँड जॉन कॅनन संघाला अांतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद
SHARES

कफ परेड येथील जी. डी. सोमाणी स्कूल येथे पार पडलेल्या अायअायएफएल वेल्थ मुंबई अांतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत फोर्टच्या कॅथेड्रल अँड जाॅन कॅनन संघाने दहावी इयत्तेच्या गटात विजेतेपदाचा मान पटकावला. अकॅडमी अाॅफ चेस ट्रेनिंग (एसीटी) तसेच एसएमसीए अाणि अायसीएस व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलने रिषभ शाह, शौर्य जैन, हिमय कपाडिया अाणि दर्श जोशी या फिडे मानांकित खेळाडूंच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले.


सर्व सहा सामन्यांत बाजी

स्टार खेळाडू संघात असल्यामुळे या स्पर्धेवर कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. सर्वच्या सर्व सहा सामन्यांमध्ये कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलच्या बुद्धिबळपटूंनी विजय मिळवत १२ गुणांची कमाई केली. त्यामुळे गटात अव्वल स्थान पटकावून कॅथेड्रल संघाने विजेतेपदावर नाव कोरले. गुरुकुल शाळेने ९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. कांदिवलीच्या ठाकूर पब्लिक स्कूलला ६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


डाॅन बाॅस्को शाळेला विजेतेपद

दरम्यान, माटुंगा येथील डाॅन बाॅस्को शाळेने अाठवीच्या गटात अव्वल स्थान पटकावून १२ गुणांसह विजेतेपद प्राप्त केले. माहिमच्या बाॅम्बे स्काॅटिश संघाने सहावी च्या गटात विजेतेपदाचा मान प्राप्त केला. ज्युनियर गटातील चौथी व दुसरीच्या गटात, अनुक्रमे बी. डी. सोमाणी इंटरनॅशनल स्कूल अाणि हिरानंदानी फाऊंडेशन यांनी विजेतेपद पटकावले. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व प्रमाणपत्रे देण्यात अाली.


हेही वाचा -

बार्सिलोना, युव्हेंट्सचे देव मुंबईत अवतरणार

मुंबई सिटी एफसी संघात बिपीन सिंगचा समावेश

ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा