Advertisement

सीसीअाय स्नूकर स्पर्धेत निशांत डोसाची तिसऱ्या फेरीत अागेकूच


सीसीअाय स्नूकर स्पर्धेत निशांत डोसाची तिसऱ्या फेरीत अागेकूच
SHARES

क्रिकेट क्लब अाॅफ इंडियाच्या निशांत डोसा अाणि सिदराज शाह यांनी घरच्या मैदानावर रंगणाऱ्या सीसीअाय अखिल भारतीय अोपन स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये अापापले सामने सहज जिंकत तिसऱ्या फेरीत अागेकूच केली अाहे. सीसीअायमधील विल्सन जोन्स बिलियर्डस रूममध्ये सुरू असलेल्या अाणि १२.२५ लाख रुपये बक्षिसांच्या या स्पर्धेत निशांतला अटीतटीच्या रंगलेल्या दुसऱ्या फेरीत कुलाब्याच्या चेराग रामकृष्णनचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. अखेर ३-२ अशा फरकाने विजय मिळवून निशांतने तिसरी फेरी गाठली.


पाच फ्रेमपर्यंत रंगला थरार

निशांत अाणि चेराग यांच्यातील सामना पाच फ्रेमपर्यंत रंगला. निशांतने दोन फ्रेम जिंकून २-१ अशी निसटती अाघाडी घेतली होती. त्यानंतर रामकृष्णनने कडवी लढत देऊन चौथी फ्रेम जिंकली अाणि सामन्यात रंगत अाणली. निर्णायक पाचव्या फ्रेममध्ये मात्र निशांतने अापल्या फटक्यांवर नियंत्रण राखत विजयश्री खेचून अाणली. त्याने हा सामना ४१-५५, ५२-४५, ५८-४०, ५२-५७, ५७-३७ अशा फरकाने जिंकला.


सिदराज शाहचा सहज विजय

सिदराजने अतिशय संयमी कामगिरी करत गोरेगाव क्लबच्या बी. केशवचे अाव्हान तीन फ्रेममध्येच संपुष्टात अाणले. सुरुवातीपासून गुणांसाठी धडपडणाऱ्या केशवला अखेरपर्यंत सूर गवसला नाही. त्यामुळे सिदराजने हा सामना ५४-१७, ६०-९, ५३-४६ असा सहज जिंकला.


हेही वाचा -

सीसीअाय स्नूकरमध्ये १२ वर्षांच्या शाहयान राझमीने जिंकली मने


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा