'सेंट्रल झोन' संघाचा शानदार विजय

 Churchgate
'सेंट्रल झोन' संघाचा शानदार विजय
Churchgate, Mumbai  -  

चर्चगेट - मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सय्यद मुस्ताक अली टी - 20 स्पर्धेत बुधवारी सेंट्रल झोन या संघाने नॉर्थ झोनवर 4 धावांनी थरारक विजय मिळवला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना सेंट्रल झोनने सात गड्यांच्या मोबदल्यात 167 धावा बनवल्या. नमन ओझा आणि महेश रावत या दोघांनी चांगली खेळी केली. नॉर्थ झोन संघासमोर 168 धावांचे आव्हान होते. त्यांचे खेळाडू एक-एक करून तंबूत परत गेल्याने  नॉर्थ झोन संघाची अवस्था गंभीर झाली. त्यानंतर मधल्या फळीतील युवराज सिंह आणि मनप्रित गोनी यांनी केलेली खेळी नॉर्थ झोन संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. सेंट्रल झोनच्या लेग स्पिनर करण शर्माने 3 बळी घेतले. तर, दुसरीकडे ईस्ट झोनने साऊथ झोनला 6 बळी घेऊन पराभूत केलं. ईस्ट झोनकडून इशंक जग्गी आणि सौरभ तिवारी या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावत 19.4 षटकांत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

Loading Comments