वडाळ्यात सुपर लीग बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

 wadala
वडाळ्यात सुपर लीग बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन
wadala, Mumbai  -  

वडाळा - शालेय मुलामुलींसाठी स्वर्गीय बाबुराव शेटे स्मृती चषक मुंबई सुपर लीग बुद्धीबळ स्पर्धा 11 मार्चपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी (८ एप्रिल वगळून) आयोजित करण्यात आली आहे. मुंबई शारिरीक शिक्षण मंडळ आणि आयडियल स्पोर्ट्स अकादमीतर्फे मुंबई शहर जिल्हा बुद्धीबळ संघटना सहकार्याने ही स्पर्धा वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात होणार आहे. एक दिवसीय बुद्धीबळ स्पर्धांमधून गुणांकानुसार पात्र ठरणारे ज्युनियर खेळाडू 15 आणि 16 जुलैला होणाऱ्या स्वर्गीय बाबुराव शेटे जयंती निमित्तच्या सांघिक मुंबई सुपर लीग बुद्धीबळ स्पर्धेत सहभागी होतील.

येत्या शनिवारी होणारी एक दिवसीय जलद बुद्धीबळ स्पर्धा शालेय मुलामुलींच्या 8, 10, 12, 14 वर्षे अशा चार वयोगटात होणार आहे. स्विस लीग पद्धतीची प्रत्येक फेरी 15 मिनिटे अधिक 5 सेकंद इन्क्रिमेंट वेळेच्या मर्यादेत होणार आहे. प्रत्येक वयोगटामध्ये बाबुराव शेटे स्मृती चषक स्वरुपात मुलांसाठी 10 पुरस्कार आणि मुलींसाठी 8 पुरस्कार दिले जातील.

Loading Comments