Advertisement

आंतरशालेय हॉकी लीगमध्ये चिल्ड्रन्स अकादमीला विजेतेपद


आंतरशालेय हॉकी लीगमध्ये चिल्ड्रन्स अकादमीला विजेतेपद
SHARES

मालाड येथील चिल्ड्रन्स अकादमीने अंतिम फेरीत कम्बाइन्ड स्कूल्सचा २-१ असा पराभव करत आंतरशालेय चॅम्पियन्स लीग हॉकी स्पर्धेमध्ये विजेतेपद संपादन केले. सेंट पीटर्स यूथ सेंटरने आयोजित केलेल्या आणि वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलच्या फादर डॉनली स्पोर्टस कॉम्प्लेक्स आर्टिफिशियल टर्फवर खेळविण्यात आलेल्या या विजेत्या संघाकडून ओम राठोड आणि रिथम ममनाय यांनी गोल करत चिल्ड्रन्स अकादमीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कम्बाइन्ड स्कूलकडून एकमेव गोल गोविंद नाग याने केला.


हे ठरले सर्वोत्तम

रिथम ममनाय याला अंतिम फेरीतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. गोविंद नाग हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. गोलरक्षकाच्या पुरस्कारासाठी तीन जणांना सन्मानित करण्यात आले. डॉन बॉस्कोचा ख्रिस जॉन्सन, सेंट स्टॅनिस्लॉस शाळेचा रुबेन डिसूझा आणि कम्बाइन्ड स्कूलचा कामरान शेख हे तिघे सर्वोत्तम गोलरक्षकाचे मानकरी ठरले.


सी व्ह्यूला सिनियर गटाचे जेतेपद

पुरुषांच्या सिनियर गटाच्या हॉकी लीगमध्ये सी व्हयू संघाने अंतिम फेरीत बॉम्बे रिपब्लिकन्सचे आव्हान २-१ असे परतवून लावले. लक्ष्मण राव आणि ऑलिम्पियन हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी गोल करत सी व्हयूच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत संघाकडून मेघराज एस. याने एकमेव गोल केला. सी व्हयूचा विजय कन्नन हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू तर मेघराज हा अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.


हेही वाचा -

माजी क्रिकेटपटूंनाही मिळणार एमसीएत मतदानाचा हक्क

रवी शास्त्रींच्या अायुष्यात अाली 'ही’ अभिनेत्री?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा