Advertisement

वार्षिक फुटबॉल स्पर्धेसाठी विद्यार्थी सज्ज


वार्षिक फुटबॉल स्पर्धेसाठी विद्यार्थी सज्ज
SHARES

दादर - बुधवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक मैदानांमध्ये पाणी साचले आहे. अशीच अवस्था शिवाजी पार्क मैदानाची झालेली दिसून येत आहे. परंतु किर्ती महाविद्यालयाचे विद्यार्थी शुक्रवारी या चिखलात फुटबॉलचा सराव करताना दिसून आले. किर्ती महाविद्यालयामध्ये 11वी ते 15वीत शिकणाऱ्या 11-11 विद्यार्थ्यांचे ज्युनिअर सिनिअर असे दोन फुटबॉलचे संघ आहेत. हे विद्यार्थी सध्या मुंबई विद्यापीठात आयोजित केल्या जाणा-या वार्षिक फुटबॉल टुर्नामेंटचा सराव करत आहेत. गतवर्षी किर्ती महाविद्यालयातील या संघाने मुंबई विद्यापीठातील टुर्नामेंटमध्ये कॉटर फाइनलपर्यंत बाजी मारली होती. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा