SHARE

वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं अापल्या शिरपेचात मानाचा अाणखी एक तुरा रोवला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच मीराबाईने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये विक्रमी कामगिरी करत भारताला पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं. एकूण १९६ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या मीराबाईनं करारा स्पोर्टस अाणि लेजर सेंटरमधील भारतीय चाहत्यांची वाहवा मिळवली.


मीराबाईची कामगिरी

दमदार कामगिरी करत मीराबाईने विक्रमी कामगिरीची नोंद करून भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. स्नॅच प्रकारात पहिल्या तीन प्रयत्नांत तिनं ८० किलो, ८४ किलो अाणि ८६ किलो इतकं वजन उचललं. त्यानंतर क्लिन अाणि जर्क प्रकारात तिने १०३ किलो, १०७ किलो अाणि ११० किलो असं वजन उचलत राष्ट्रकुलमध्ये विक्रमी कामगिरी नोंदवली.


याअाधीची कामगिरी

यापूर्वी मीराबाईनं २०१५ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्याची किमया केली होती. २३ वर्षांच्या मीराबाईनं काही महिन्यांपूर्वी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये १९४ किलो वजन उचलून जेतेपद पटकावलं होतं.


हेही वाचा -

ठाण्याचा नुबैरशाह शेख राष्ट्रकुल बुध्दिबळ स्पर्धेत सुवर्णपदाचा मानकरी

संबंधित विषय
ताज्या बातम्या