चुकीच्या निर्णयाचा ऑनलाइन निषेध


SHARE

करी रोड - मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद प्रथम श्रेणीच्या स्थानिक पुरुष गटाचा सामना खूपच अटीतटीचा झाला. पण शिवशक्ती क्रीडा मंडळ आणि बंड्या मारुती सेवा संघातल्या अंतिम सामन्यात पंचांच्या चुकीच्या निर्णयाने वाद निर्माण झाला. पंच समिती आणि शिवशक्ती मंडळ खेळाडूंचा वा वाद इतका टोकाला गेला की, जेतेपदाचा अंतिम सामना शिवशक्ती मंडळानं मध्येच सोडून दिला. या निर्णयाचा निषेध आता खेळाडूंकडून सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून नोंदवला जातोय. त्याला मोठ्या प्रमाणात कॉमेंट आणि रिऍक्शन मिळत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या