सामाजिक एकतेसाठी पोलिसांचा पुढाकार

 wadala
सामाजिक एकतेसाठी पोलिसांचा पुढाकार
सामाजिक एकतेसाठी पोलिसांचा पुढाकार
सामाजिक एकतेसाठी पोलिसांचा पुढाकार
सामाजिक एकतेसाठी पोलिसांचा पुढाकार
See all

अँटॉप हिल - सी.जी.एस कॉलनी सेक्टर सहा परिसरात अनोख्या क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई पोलीस आणि मोहल्ला कमिटी परिमंडळच्या वतीने सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी सिमेंट ग्राऊंडमध्ये हा सामना खेळवण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांनी स्वत: मैदानात उतरून क्रिकेट खेळून केलं. सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक सातपुते, वडाळा टीटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे, समन्वयक मोहल्ला कमिटी परिमंडळ चारचे विश्वास सोनावणे आदी उपस्थित होते.

Loading Comments