Advertisement

खड्डा चुकवणं क्रिकेट पंच डाॅ. प्रकाश वझे यांच्या जीवावर बेतलं


खड्डा चुकवणं क्रिकेट पंच डाॅ. प्रकाश वझे यांच्या जीवावर बेतलं
SHARES

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यावर उपचार करणारे तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सुवर्णपदक विजेते क्रिकेट पंच डाॅक्टर प्रकाश वझे यांना रस्त्यातील खड्डा चुकविणं जीवावर बेतलं अाहे. ठाण्यातील अानंदनदर चेकनाका परिसरात झालेल्या अपघातात एका ट्रकने वझे यांना धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


अनेक पंच घडविले

सुवर्णपदक जिंकणाऱ्या वझे यांनी एमसीएच्या अनेक प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले. तसेच अनेक वर्षे त्यांनी क्रिकेट पंच शिबिरे अायोजित करून अनेक होतकरू पंच घडविले होते. 


अनेक क्रीडा स्पर्धांचं अायोजन 

डॉक्टर प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी टेनिस, डबल विकेट क्रिकेट, बॅडमिंटनच्या राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन केलं होतं. तसेच स्थानिक पातळीपासून ते फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करून डॉक्टर वझे यांनी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा