Advertisement

चेसमध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल 7 वर्षाच्या चिमुकल्याला राष्ट्रपती पुरस्कार


चेसमध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल 7 वर्षाच्या चिमुकल्याला राष्ट्रपती पुरस्कार
SHARES

बु्द्धिबळात मास्टर असलेला 7 वर्षांचा मुंबईकर जैसल शाह याला राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्राप्त झाल्याने तो चांगलाच भारावून गेला. दादरमध्ये रहाणारा जैसल शाह बुद्धिबळ खेळण्यात मास्टर आहे. मागील दोन वर्षात झालेल्या बुद्धिबळाच्या अनेक टुर्नामेंटमध्ये जैसल विजयी ठरला. आता महाराष्ट्रात राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवणारा जैसल शाह हा एकुलता विजेता ठरला आहे.


दिल्लीत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

बालदिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 16 मुलांसह जैसलाही रजत पदक, दहा हजार रुपये रोख, रजत पदक, प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाल्याने मुलांचा आत्मविश्वास द्गिगुणीत झाला होता.


काय म्हणाली जैसलची आई?

जैसलची आई म्हणते 'बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याचा खेळ बघितल्यानंतर जैसलला बुद्धिबळ खेळण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर हळूहळू तो स्पर्धेत भाग घेऊ लागला. अशाच स्पर्धा खेळताना राज्याच्या अधिकाऱ्यांनी पाहिले आणि त्यांनी जैसलचे नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी नामांकन केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा