सबज्युनियर बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारी सेमीफायनलमध्ये


SHARE

तारा शाह अाणि दर्शन पुजारी या अव्वल मानांकित खेळाडूंनी अनुक्रमे १५ वर्षांखालील मुली-मुलींच्या गटात अापापले सामने जिंकून उपांत्य फेरीत मजल मारली अाहे. मुलुंड पश्चिम येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्पोर्टस काॅम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र सबज्युनियर राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत ताराने ठाण्याच्या अादिती रावविरुद्ध २३-२१, २१-११ असा विजय संपादन केला. दर्शनने मुंबई उपनगरच्या अथर्व जोशीला २१-१२, २१-१५ अशी सरळ गेममध्ये धूळ चारली.


खुशी कुमारीची अागेकूच

१५ वर्षांखालील मुलींच्या गटात ठाण्याच्या खुशी कुमारीने मान्या अल्वानी हिचा २१-१९, २१-१७ असा पाडाव करत अंतिम चार जणींमध्ये स्थान मिळवले. याच गटात पुण्याच्या रिया हब्बू हिने नागपूरच्या अादिती साधनकर हिला २१-११, २१-१३ असे पराभूत केले.


ध्रूव टाकोरे उपांत्य फेरीत

मुलांच्या १५ वर्षांखालील गटात पुण्याच्या ध्रूव टाकोरेने नागपूरच्या शशांक कुलाल याच्यावर २१-१०, २१-१५ अशी मात केली. नागपूरच्या सिद्धांत बावनकर अाणि सार्थक पाखमोडे या बॅडमिंटनपटूंनीही अापापले सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली.


हेही वाचा -

सबज्युनियर बॅडमिंटन : मनाली परुळेकरची उपांत्यपूर्व फेरीत धडक

अॅबी कुरुविलाही मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी रिंगणातसंबंधित विषय
ताज्या बातम्या