Advertisement

महाराष्ट्र महिला मास्टर्स बॅडमिंटन लीगमध्ये डेडली ड्रिबलर्सला विजेतेपद


महाराष्ट्र महिला मास्टर्स बॅडमिंटन लीगमध्ये डेडली ड्रिबलर्सला विजेतेपद
SHARES

बाॅम्बे जिमखान्यातर्फे अायोजित अाणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) व ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिपत्याखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य महिला मास्टर्स बॅडमिंटन लीगमध्ये डेडली ड्रिबलर्सने डॅझलिंग फीदर्सचा ४-१ असा पराभव करत जेतेपद पटकावले. कर्णधार दीपाली जोशी अाणि अजिता रवींद्रन यांनी पालकेन दवे अाणि चेतना शाह जोडीचा १५-१४, १५-९ असा पराभव करून डेडली ड्रिबलर्सला सुरेख सुरुवात करून दिली. त्यानंतर डीने राॅड्रिगेझ अाणि मिनोती अानंद यांनीही विजय मिळवत डेडली ड्रिबलर्सची अाघाडी २-० अशी वाढवली.


तिसऱ्या सामन्यात डेडली ड्रिबलर्सला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. बिनाफेर भरुचा अाणि नीलम चौहान यांनी लोरेन डिमेलो अाणि रुची गुप्ता यांनी हरवत डॅझलिंग फीदर्सच्या विजेतेपदाच्या अाशा कायम राखल्या. त्यानंतर पुढील दोन्ही गेम जिंकून डेडली ड्रिबलर्सने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. बिनाफेर भरुचा-नीलम चौहान या जोडीने शिखा लॅम्ब अाणि परोमिता फुलवारिया यांना ११-१५, १५-१३, ११-६ असा हरवत चौथा सामना जिंकून ३-१ अशी अाघाडी मिळवून दिली. अखेरच्या सामन्यातही लोरेन डिमेलो-रुची गुप्ता यांनी निधी होसांगडी अाणि वनेसा परेरा यांना १५-१०, ८-१५, ११-९ असे हरवले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा