SHARE

हरयाणाच्या चौथ्या मानांकित दिवेश गेहलोत यानं अासामच्या दुसऱ्या मानांकित उदित गोगोई याचा पाडाव करत चर्चगेट येथील सीसीअाय टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या एमएसएलटीए-योनेक्स सनराइज १२व्या रमेश देसाई स्मृती टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम फेरीत मजल मारली अाहे. अखिल भारतीय राष्ट्रीय १६ वर्षांखालील स्पर्धेच्या मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या सुदिप्ता कुमार हिनं अापलीच सहकारी प्रेरणा देसाई हिला धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला अाहे.


सुदिप्ताचा सहज विजय

एअायटीए रँकिंगमध्ये १८व्या क्रमांकावर असलेल्या सुदिप्ताने पहिल्या सेटमध्ये एकही गेम न गमावता हा सेट अापल्या नावावर केला. दुसऱ्या सेटमध्येही तिने सहज विजय मिळवत प्रेरणा देसाई हिचे अाव्हान अारामात परतवून लावले. सुदिप्ताने हा सामना ६-०, ६-२ असा सहज खिशात घातला. अाता अंतिम फेरीत तिला हरयाणाच्या संदीप्ती राव हिच्याशी लढत द्यावी लागेल.


दिवेशला उदितचा कडवा प्रतिकार

दिवेशने अंतिम फेरीत मजल मारली असली तरी त्याला उपांत्य फेरीत उदितच्या कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले. उदितने पहिला सेट सहज जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये दिवेशने उदितची डाळ शिजू दिली नाही. तिसऱ्या अाणि निर्णायक सेटमध्ये दोघांनीही तोडीस तोड खेळ केला. अखेर दिवेशने ही लढत ३-६, ६-०, ७-६ (५) असा जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला.


प्रेरणाचा दुसरा पराभव

मुलींच्या दुहेरीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राची प्रेरणा देसाई अाणि रिचा चौगुले यांना पराभवाचा सामना करावा लागला. संदीप्ती राव अाणि उत्तर प्रदेशची वंशिका चौधरी यांनी त्यांच्यावर ६-३, ६-३ अशी मात करत जेतेपद पटकावलं. उदयवीर सिंग अाणि ध्रूव टांगरी यांनी सुशांत डब्बास व दिवेश गेहलोत यांचा ६-३, ३-६, १०-८ असा पराभव करून मुलांच्या दुहेरीचे जेतेपद पटकावले.


हेही वाचा -

विराट माणूस अाहे मशीन नाही - शास्त्रींनी टीकाकारांना सुनावलं

एबी डिव्हिलियर्सची धक्कादायक निवृत्ती

संबंधित विषय
ताज्या बातम्या